एक्स्प्लोर

दाभोलकर, गौरी लंकेश हत्या: चिखलेतील जंगलात आरोपींना ट्रेनिंग?

एबीपी माझानं थेट चिखलेत जाऊन या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला. भरत कुरणेचं हे रिसॉर्ट चिखले या गावातील जंगल परिसरात आहे.

बेळगाव: डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील चिखले गावात ट्रेनिंग दिल्याचं समोर येतंय. याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी चिखले गावातील घनदाट जंगलात असलेल्या रिसॉर्टवर छापा टाकून झाडाझडती केली. विशेष म्हणजे हे रिसॉर्ट भरत कुरणेच्या मालकीचं आहे आणि तो सध्या गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या अटकेत आहे. एबीपी माझानं थेट चिखलेत जाऊन या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला.  भरत कुरणेचं हे रिसॉर्ट चिखले या गावातील जंगल परिसरात आहे. याच परिरात डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा संशय कर्नाटक एटीएस आणि कर्नाटक पोलिसांना आहे. यामुळे चिखले गावातील परिसरात असणाऱ्या या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी सध्या कर्नाटकातील विशेष पोलीस पथक या परिसरात तपास करत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिखले हे गाव तसं निसर्गाने संपन्न आहे.  चिखले गाव परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. कर्नाटक आणि गोवा राज्य या दोन्हींच्या मध्यभागी असणारा हा परिसर. त्यामुळेच भरत कुरणेने इथं टुमदार रिसॉर्ट बनवलं आहे. याच ठिकाणी दाभोळक, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येचा कट बनविला. याच परिसरात बंदूक चालविण्याचे प्रशिक्षणही घेण्यात आल्याचा संशय आहे. नालासोपारा स्फोटकं आणि दाभोलकर हत्येप्रकरणी अटकसत्र महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपाऱ्यातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ता वैभव राऊतच्या घरी धाड टाकली. या धाडीत त्यांना स्फोटकं सापडली. याप्रकरणी वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसने चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना 10 ऑगस्टला अटक केली. नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. मग एटीएसने सचिन अंदुरेला औरंगाबादेतून 18 ऑगस्टला रात्री अटक केली. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसरकर) शरद कळसरकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरे हाच दाभोलकर हत्या प्रकरणातील शूटर आहे, असं सीबीआयचं म्हणणं आहे. 'अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे मास्टरमाईंड' अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे मास्टरमाईंड असल्याचा संशय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आहे. त्यामुळेच अमोल काळेची सखोल चौकशी करण्यासाठी त्याची कोठडी घेण्याची तयारी डॉ. दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय टीमने केली आहे. इतकंच नव्हे, तर अमोल काळे आणि वीरेंद्र तावडेच्या आदेशावरुनच सचिन अंदुरे आणि शरद कळसकरने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे. अमोल काळे, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे अटकेत गौरी लंकेश हत्या प्रकरणी अमोल काळे याला मे महिन्यात बंगळुरु एटीएसने अटक केली आहे, तर वीरेंद्र तावडे याला दाभोलकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. शरद कळसकर हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या हाती लागला. त्यावेळी तपासातच कळसकरचा दाभोलकर हत्येशी संबंध असल्याचे लक्षात आले आणि अधिक चौकशीनंतर त्याचा दाभोलकर हत्येशी थेट संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर कळसकरच्या चौकशीत सचिन अंदुरेचे नाव समोर आले. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे मित्र आहेत. अमोल काळे कोण आहे? अमोल काळे हा 48 वर्षीय असून, तो पुण्याच्या माणिक कॉलनीतील अक्षय प्लाझातील रहिवासी आहे. पत्नी जागृती, पाच वर्षांचा मुलगा, म्हातारी आई यांच्याबरोबर पुण्यातील घरी अमोल राहत असे. वडिलांचं पानाची दुकान होतं, काही महिन्यांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. अमोल काळेचं डिप्लोमापर्यंतचं शिक्षण झालं असून, स्पेअर पार्टस पुरवण्याचा धंदा करत होता. कधी कधी धार्मिक पुस्तकांची विक्रीही अमोल काळे करायचा. कोण आहे वीरेंद्र तावडे? वीरेंद्र तावडे हा पेशाने डॉक्टर असून, काना, नाक आणि घशाचा तज्ञ आहे. पनवेलमधल्या सनातनच्या आश्रमात तीन वर्षांपासून साधकांची आरोग्यसेवा करतो. 15 वर्षांपासून सनातनचा साधक आहे. वीरेंद्र तावडे सीबीआयच्या ताब्यात आहे. सचिन अंदुरे कोण आहे? सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे. शरद कळसकर कोण आहे? शरद कळसकर मूळचा औरंगाबादमधील केसापुरीचा रहिवासी आहे. औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करत असल्याचं घरी शरदने सांगितले होते. वडिलांकडे सहा एकर शेती आहे. शरदला पुणे, सोलापूर, सातारा, नालासोपाऱ्यात घातपाताच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही शरदने दिली आहे. संबंधित बातम्या अमोल काळे, वीरेंद्र तावडे हेच दाभोलकरांच्या हत्येचे मास्टरमाईंड : सीबीआय   डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रावरुन नवा वाद  डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : दिवसभरात औरंगाबादमध्ये काय-काय घडलं?   दाभोलकर हत्या : अंदुरेच्या नातेवाईक-मित्राच्या घरातून शस्त्रसाठा जप्त  गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या डायरीत आणखी सहा नावं : सूत्र   डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलिस कोठडी 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget