एक्स्प्लोर
Advertisement
डॉ. जगन्नाथ दीक्षित स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर
डॉ. जगन्नाथ दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई : स्पेशल डाएट प्लॅनमुळे चर्चेत आलेले लातूरचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे. राज्य सरकारने स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून डॉ. दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात दीक्षितांनी सांगितलेली स्वास्थ्यशैली जनमानसात लोकप्रिय झाली असून अनेक जणांनी त्याचं अनुकरण सुरु केलं आहे.
डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांना सोमवारी नियुक्तीचं पत्र दिलं. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्थूलता नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे. स्थूलतेचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेअंतर्गत डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, अशी आशा शासनाने व्यक्त केली आहे.
शारीरिक स्वास्थ्याचं आहाराशी असलेल्या नात्याबाबत संशोधन करुन डॉ. दीक्षित यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून 'दीक्षित डाएट प्लॅन' नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.
शासनाच्या निर्णयामुळे अत्यंत आनंद झाल्याच्या भावना डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केल्या. गेल्या सहा वर्षांपासून काम सुरु होतं, मात्र शासनाच्या मान्यतेमुळे पुढील मार्ग सोपा झाल्याचं डॉ. दीक्षित म्हणाले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्य आणि देशात जाऊन ही पद्धत पोहचवणं सुकर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपल्या सहकाऱ्यांना आधार मिळाल्याची प्रतिक्रियाही यावेळी डॉ. दीक्षित यांनी दिली.
माझा कट्टा | डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत आरोग्यदायी डाएटकट्टा
हेल्थ टिप्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement