एक्स्प्लोर

मोठी बातमी : मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध भूमिका घेणारे अधिकारी भगवान पवारांच्या अडचणी वाढल्या, मीडियाला पत्र पुरवल्याचा ठपका

Maharashtra News: मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्यावरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

Dr. Bhagwan Pawar : मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार (Dr. Bhagwan Pawar) यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. डॉ. भगवान पवारांना राज्य सरकारकडून (Maharashtra Government) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 3 दिवसांत नोटीसला उत्तर न दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांच्यावरच कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का झाली? हे सांगणारं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आणि त्याच वेळी ते समाज माध्यमांत व्हायरल झालं, यामुळे सरकारची बदनामी झाली, अशी नोटीस डॉ. भगवान अंतू पवार पाठवण्यात आली आहे. सरकारकडून डॉक्टर भगवान पवार यांना पाठवण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस एबीपी माझाकडे आहे. त्या नोटिशीचा खुलासा तीन दिवसांत न केल्यास डॉ. भगवान पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल, असं म्हटलं आहे.

राज्य सरकारकडून डॉ. पवारांना कारणे दाखवा नोटीस 

मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात भूमिका घेणारे निलंबित वैदयकिय अधिकारी डॉ.  भगवान अंतू पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतर भगवान पवार यांनी  मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत, शासनाकडून पवार यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

एबीपी माझाच्या हाती ही नोटीस लागली असून या नोटिशीचा खुलसा 3 दिवसांत न केल्यास डॉ. भगवान पवार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात येईल, असं म्हटलं आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी दबाव टाकून निलंबनाची कारवाई केल्याबाबतच्या आरोपाची प्रत पवार यांनी 24 मे रोजी विहित मार्गानं शासनाला दिल्याचं म्हटलं आहे. 

प्रत्यक्षात मात्र 25 मे आणि 26 मे रोजी शनिवार, रविवार असल्यानं सार्वजनिक सुट्टी असल्यानं ते निवेदन पत्र शासनाकडे 27 मे रोजी प्राप्त झालं. मात्र, त्या पूर्वीच पवार यांच्या निवेदनाच्या बातम्या माध्यम आणि वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या, अनेक लोकप्रतिनिधींनीही त्या समाजमाध्यमांवर पोस्ट झाल्यानं शासनाची बदनामी झाल्याचं नोटीशीत म्हटलं आहे. हे निवेदन पवार यांनीच प्रसारमाध्यमांना पुरवल्याचा ठपका या नोटीशीतून ठेवत, पवार यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा  वर्तवणूक नियम 1979 मधील नियम 3 आणि 9 चा भंग केल्याचं नोटिशीत म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरRaj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP MajhaAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Embed widget