नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्याची आत्महत्या, प्रेम प्रकरणातून घटना घडल्याचा संशय
नांदेडमधील विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे.
नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण रूग्णालय सध्या कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत आहे. त्यात रुग्णालयातील बायोवेस्टज असो, तेथील सुरक्षा व्यवस्था असो अथवा आज दोन दिवसांपूर्वी रुग्णालयासमोर व्यक्तीला डुकरांनी तोडून खाल्ल्याची घटना असो. आज डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय ऐका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आलंय. कारण प्रजासत्ताक दिनी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या इका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने रुग्णालयातील सर्जिकल विभागात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
35 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन हत्या; गावकऱ्यांचा कँडल मार्च, आरोपीला फाशी देण्याची मागणी
मृत आकाश गिरी हा रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असून वडिलांच्या जाग्यावर अनुकंपा तत्वावर लागल्याची माहिती मिळाली आहे. शासकीय रुग्णालयातील या कर्मचाऱ्याने त्याच्या विभागाचे वरिष्ठ भीमराव परोडवाड यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. परंतु, या घटने विषयी अधिक माहिती नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्याकडून घेतली असता, सदर तरुणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु
प्रेम प्रकरणातून आत्महत्या झाली का? कारण सदर तरुणाचे त्याच्या नात्यातील तरुणीवर प्रेम होते. परंतु, तो लग्न करण्यास तयार होत नसल्यामुळे त्याची तक्रार तरुणीने पोलिसात दिली होती. परंतु, नंतर लग्न करतो असे लेखी दिल्यानंतर ती तक्रार मागे घेण्यात आली आणि आज ही घटना घडली. त्यामुळे ही आत्महत्या असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आकाश गिरी या कर्मचाऱ्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली का? की वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. परंतु, या घटनेविषयी कोणतीही तक्रार अद्याप न आल्यामुळे आकस्मित मृत्यूची नोंद ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे.