एक्स्प्लोर
Advertisement
निवेदन घेऊन विभागीय आयुक्त परळीतील मोर्चेकऱ्यांच्या भेटीला
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी परळीतील मराठा मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असणारे निवेदन देऊन विभागीय आयुक्तांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली.
बीड : विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी परळीतील मराठा मोर्चाच्या आंदोलकांची भेट घेऊन सरकारची बाजू मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका असणारे निवेदन देऊन विभागीय आयुक्तांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली.
‘आम्ही मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी आणि आंदोलकांशी चर्चा करु, त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घ्यायचे की नाही याचा निर्णय घेऊ,’ अशी भूमिका विभागीय आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर आंदोलकर्ते आबा पाटील यांनी मांडली आहे.
परळीमध्ये सुरु असलेल्या मराठा मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाचा आजचा बारावा दिवस आहे.
दरम्यान, काल (28 जुलै) रात्री मुख्यमंत्री कार्यालयाकडून आंदोलकांना चर्चेसाठी विचारणा करण्यात आली. पण जी काही चर्चा करायची असेल ती परळीत आंदोलनस्थळीच करा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. त्यामुळे परळीतील कुणीही आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला गेले नाहीत.
मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक
परळीतील आदोलकांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यास नकार दिला असला तरी मराठा आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. राज्यसभा खासदार नारायण राणे आणि काँग्रेस आमदार नितेश राणेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या आंदोलकांची नावं मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात आली नाहीत.
‘मुख्यमंत्र्यांसोबत ज्यांची बैठक झाली, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही,’ असं मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केलं. आधीच मागण्या दिलेल्या असताना चर्चेचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. तसा ठरावही आज लातूरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement