एक्स्प्लोर
धडकन.. ऊलाला... बाहुबली... विदर्भातील हटके कीटकनाशकं
तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही हे शब्द वेगळ्या अर्थानं वापरत असलात, तरी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रभावी कीटकनाशकं आहेत.
नागपूर : एखाद्या दुकानात जाऊन तुम्ही 500 एमएल पोलिस द्या किंवा 1 लिटर बाहुबली द्या असं विचारलंत तर??? सध्या विदर्भातले शेतकरी पोलिस, बाहुबली आणि उलाला विकत घेण्यासाठीच दुकानात जाताहेत
विदर्भातल्या काही दुकानात पोलिस विकत घेता येतो. इतकंच नाही, तर खिशात पैसे असतील तर कोहिनूर आणि सॅटेलाईटवरही कब्जा मिळवता येतो. थोडसं विचित्र वाटेल, मात्र वर्ध्यातल्या कीटकनाशकांच्या दुकानात येणाऱ्या व्यक्ती पोलिस, कोहिनूर आणि सॅटेलाईटच विकत घ्यायला येतात.
याचं कारण म्हणजे, सध्या अशा हटके ब्रँडच्या कीटकनाशकांचा बोलबाला आहे. काही कीटकनाशकांच्या ब्रँड्सची नावं ऐकून तुम्ही हसून लोटपोट व्हाल.
हेडलाईन... धडकन.. चमत्कार... ऊलाला... जुगाड.... बाहुबली...
तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही हे शब्द वेगळ्या अर्थानं वापरत असलात, तरी विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रभावी कीटकनाशकं आहेत.. सध्या कीटकनाशकांच्या बाजारातली स्पर्धा वाढली आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं उत्पादन शेतकऱ्यांच्या लगेच लक्षात रहावं म्हणून कंपन्यांनी शब्दांचा खेळ सुरु केला आहे.
काही शेतकरी कीटकनाशकांच्या हटके ब्रँडला भुलतात तर काही शेतकऱ्यांचा संभ्रम चांगलाच वाढला आहे. नावात काय ठेवलं आहे, असं जगविख्यात साहित्यिक शेक्सपियरचं सर्वात चर्चिलं जाणारं हे वाक्य. मात्र विदर्भातल्या
कीटकनाशकांच्या दुकानांचा फेरफटका मारल्यानंतर नावातच सर्व काही आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement