एक्स्प्लोर

प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारा धनगर मेळावा उधळण्याचा इशारा

महाराष्ट्रात धनगर समाजात आरक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. मागील अनेक वर्ष केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सदैव धनगर समाजावर अन्याय केला आहे.

पंढरपूर : शरद पवार आणि प्रियांका गांधी यांनी 11 ऑगस्ट रोजी अयोजीत केलेल्या मेळाव्यास येऊ नये. हा राजकीय स्वार्थासाठी घेतलेला मेळावा असून धनगर समाज हा मेळावा उधळेल, असा इशारा समाजाचे नेते सुभाष म्हस्के यांनी दिला. आज धनगर आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी आणि राज्यभरातील समाजाच्या नेत्यांची पंढरपूर येथे बैठक झाली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गेल्या 60 वर्षात समाजावर आरक्षण प्रश्नी अन्याय झाला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समाजातील काही नेते धनगर आरक्षण प्रश्नाचा राजकीय लाभ उठवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे हा मेळावा उधळून लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कॉंग्रेसमधील समाजाचे नेते आमदार रामहरी रुपनवर आणि राष्ट्रवादीमध्ये असलेले आण्णा डांगे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. आता धनगर समाजातूनच याला विरोध होऊ लागल्याने समाजात उघड पक्षीय फुट पडल्याचे चित्र आहे. गेल्या आठ वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काचे आरक्षण लढा लढत आहे. केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीत महाराष्ट्रातील धनगड या समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे मात्र धनगर ही जमातच राज्यात आस्तित्वात नाही. असे असताना देखील महाराष्ट्रात धनगर समाजात आरक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. मागील अनेक वर्ष केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सदैव धनगर समाजावर अन्याय केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते तरीही त्यांनी धनगर समाजाचा कधीही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, असे धनगर नेते सुभाष म्हस्के यांनी म्हटले आहे. सकल धनगर समाजाच्या या मेळाव्यास शरद पवार आणि प्रियांका गांधी येणार आहेत. जर या मेळाव्याला हे आले तर धनगर समाजातील युवकांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्या मेळाव्याचे आयोजक जबाबदार राहतील, असा इशारा यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आले. धनगर आरक्षण महामेळाव्यासाठी 11 ऑगस्ट रोजी पंढरपूरमध्ये प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार रामहरी रुपनवर आणि  आण्णा डांगे यांनी काल बैठकीत दिली होती.  सध्या धनगर समाजातील अनेक नेते भाजपसोबत असल्याने आता हा समाज वंचितांच्या मागे न जाता आपल्यामागे यावा यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली असून आघाडीकडे असलेल्या धनगर नेत्यांनी पंढरपूरमध्ये बैठक घेत दोन लाख समाजाच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये महामेळावा घेण्याची घोषणा केली आहे. या मेळाव्यास सर्व धनगर संघटना उपस्थित राहणार असल्याचा दावा करताना या मेळाव्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget