एक्स्प्लोर
सुजय विखेंसोबत प्रत्येक निर्णयात खंबीरपणे उभं राहणं अभिमानाचं : धनश्री विखे पाटील
लोकांसाठी कष्ट करणाऱ्या, त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या सुजय यांच्यासोबत नेहमीच पाठीशी राहणार असल्याचं धनश्री विखेंनी स्पष्ट केलं.
मुंबई : सुजय विखेंच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी दिली आहे. सुजय विखे पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.लोकांसाठी कष्ट करणाऱ्या, त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या सुजय यांच्यासोबत नेहमीच पाठीशी राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कुटुंबाच्या विरोधात त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असं जरी बोललं जात असलं तरीही सुजय हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते स्वत:चा निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या निर्णयाला सर्व कुटुंबाचा पाठिंबा असल्याचं धनश्री विखेंनी एबीपी माझाकडे स्पष्ट केलं.
घरामध्ये दोन विरोधी पक्षांचे नेते असल्याने तारांबळ होईल का या प्रश्नावर घरात कोणतीही राजकीय चर्चा होत नसल्याचं धनश्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. राजकारण ऑफिस किंवा घराबाहेर होत असल्याने राजकारणामुळे नातेसंबंधांमध्ये कोणताही कडवटपणा येणार नसल्याचं त्या म्हणाल्या.
लोकसभेसाठी सुजय विखेंचा प्रचार करतानाच सासरे राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रचार करायचा की नाही हे वेळ आल्यावरच ठरवू असंही त्यांनी एबीपी माझाला सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement