Dhananjay Munde : 'ती' खरेदी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच, धनंजय मुंडे दाखल करणार अंजली दमानियांवर अब्रु नुकसानीचा दावा
Dhananjay Munde Vs Anjali Damania : अंजली दमानियांनी कृषी आयुक्तांच्या पत्राचा दाखला देत धनंजय मुंडे यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर आता धनंजय मुंडे कायदेशीर उत्तर देणार आहेत. धनंजय मुंडे हे दमानिया यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. लवकरच उच्च न्यायालयात आपण फौजदारी अब्रु नुकसानीचा दावा दाखल करू अशी माहिती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. कृषी खात्यातील खरेदीची प्रक्रिया ही मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच केली होती असा दावाही मुंडे यांनी केला.
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी वस्तू खरेदीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यावर प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळले होते. दमानिया या बदनामिया आहेत असा टोलाही लगावला होता. त्यानंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत मुंडेंवर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी कृषी आयुक्तांच्या पत्राचा दाखला दिला होता.
अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांवर आता धनंजय मुंडे यांनी कायदेशीर उत्तर देण्याचं ठरवलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते लवकरच अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
ती खरेदी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्यातील खरेदी प्रक्रियेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ही खरेदी सर्व नियमांचे पालन करून आणि त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेनंतरच झाली होती असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
काय म्हटलंय धनंजय मुंडेंनी?
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.
अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 4, 2025
ही बातमी वाचा:























