एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान, धनंजय मुंडेंची घोषणा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे.

मुंबई : अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या 30 व्या नियामक मंडळाची 21 जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे! अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nalasopara Achola Vasant nagri | नालासोपाऱ्यातील आचोळा वसंत नगरीत 41 इमारतींवर पालिकेची तोडक कारवाईAjit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रि‍पदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP MajhaShrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 28 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Muslim Bollywood Actors Hindu Screen Names : दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
दिलीपकुमार ते मधुबालापर्यंत! या 11 प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सनी मुस्लिम असूनही हिंदू नावे सहज स्वीकारली
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
काळजी करु नका, देवेंद्र फडणवीसांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं वक्तव्य 
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
Shrikant Shinde Big News : एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार?
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी... मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर नेमकं काय म्हणाले रोहित पवार? 
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी
Mohammed Siraj On RCB : आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
आरसीबीसोबतची सात वर्षे माझ्या हृदयात; जिगरी दोस्त कोहलीची साथ सुटताच सिराज भावूक, राशीद खानची सुद्धा कमेंट
Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'
Embed widget