![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Bjp : भाजपचे 12 नेते करणार महाराष्ट्रात झंझावात, स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी
भाजपने आता नवी रणनिती आखली आहे. आगामी महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह बारा नेते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
![Maharashtra Bjp : भाजपचे 12 नेते करणार महाराष्ट्रात झंझावात, स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी Maharashtra Bjp news 12 BJP leaders to tour Maharashtra, fight upcoming elections on their own Maharashtra Bjp : भाजपचे 12 नेते करणार महाराष्ट्रात झंझावात, स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/31/255118e6e1abf925d32141bc4d5bb658_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Bjp : सध्या विविध मुद्यांवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्या कलगीतुरा रंगताना दिसत आहे. भाजपने विविध मुद्यावरुन राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. अशातच भाजपने आता नवी रणनिती आखली आहे. आगामी महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह बारा नेते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपकडून सुरु आहे.
विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 मतदारसंघात स्वबळावर लढण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात या नेत्यांच्या तोफा राज्यभर धडाडणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपा प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेम्यात आला. या दैऱ्यामध्ये मतदारसंघातील पक्षबांधणीपासून, सदस्य नोंदणी तर दुसरीकडे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रत्येक विषयावर भाजप लक्ष केंद्रीत करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी बारा नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर दौरा आणि संघटना बांधणी यावर या नेत्यांचा भर असणार आहे.
दरम्यान, येत्या 15 एप्रिलपासून भाजपच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान सर्व नेते राज्यभर प्रवास करणार आहेत. अर्थसंकल्पात एक यशस्वी विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पाडली. विरोधी पक्ष काय असतो, हे आम्ही दाखवलं आहे. आता आम्ही जनसामान्यांचे मुद्दे घेऊन जाणार आहोत, अशी माहिती भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली. 15 एप्रिलपासून मुंबईत पोलखोल अभियानाचीही सुरुवात केली जाणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, भाजपच्या 12 प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी असेल. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे असणार आहे. तर धुळे आणि नंदूरबारमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी रावसाहेब दानवे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड आणि जालना या लोकसभा मतदारसंघांच्या मोर्चेबांधणीची कामगिरी सोपवण्यात आली आहे.
पाहा कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी
देवेंद्र फडणवीस : सोलापूर, अहमदनगर
सुधीर मुनगंटीवार : बीड, जालना
चंद्रकांत पाटील : ठाणे ग्रामीण, नाशिक
आशिष शेलार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग
रावसाहेब दानवे : बुलढाणा, नंदुरबार
प्रवीण दरेकर : पालघर, मीरा भाईंदर
पंकजा मुंडे : कोल्हापूर, सांगली
चंद्रशेखर बावनकुळे : अकोला, अमरावती
गिरीश महाजन : उस्मानाबाद, हिंगोली
रवींद्र चव्हाण : सातारा, पुणे ग्रामीण
संभाजी पाटील निलंगेकर : गोंदिया, भंडारा
संजय कुटे : दक्षिणी रायगड, उत्तर रायगड
महत्त्वाच्या बातम्या:
- Exclusive : ...तर मंत्री बदलावेत; काँग्रेसचे एकमेव खासदार धानोरकर काँग्रेसच्याच मंत्र्याविरोधात आक्रमक
- Ajit Pawar : महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्त्वाचं सूतोवाच
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)