एक्स्प्लोर

Exclusive : ...तर मंत्री बदलावेत; काँग्रेसचे एकमेव खासदार धानोरकर काँग्रेसच्याच मंत्र्याविरोधात आक्रमक 

Congress MP Balu Dhanorkar Exclusive : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्याच पक्षाचे राज्यातले मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Congress MP Balu Dhanorkar Exclusive : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्याच पक्षाचे राज्यातील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा बँकेत विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांचं वर्चस्व असताना झालेल्या कारभाराविरोधात लोकसभेत आवाज उठवल्यानंतर आज धानोरकर यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. बाळू धानोरकर यांच्या पत्नीही काँग्रेसच्या आमदार आहेत. आता काँग्रेस आमदारांच्या सोनिया भेटीसाठीही ते प्रयत्न करत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर खासदार बाळू धानोरकर यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला. यावेळी त्यांनी काही गंभीर आरोप केले. खासदार बाळू धानोरकर यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून ते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आक्रमक आहेत. संसदेत सुद्धा त्यांनी चंद्रपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचा विषय उपस्थित केला होता ‌. 

 मी खासदार, माझी बायको आमदार आम्हाला सुद्धा कर्ज मिळत नाही

 खासदार धानोरकर म्हणाले की, ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत असा माणूस चंद्रपूर जिल्हा बँकेवर नेमला आहे. मी खासदार, माझी बायको आमदार आम्हाला सुद्धा कर्ज मिळत नाही.. आम्हाला कर्ज मिळत नाही तर सर्वसामान्यांना न्याय मिळेल का, असं ते म्हणाले. 

अनेक ठिकाणी निधीचं समान वाटप होत नाही अशी आमदारांची तक्रार 

त्यांनी पुढं म्हटलं की, विजय वडेट्टीवार आणि माझा वाद हा विषय नाही. बँकेचा सीओ हा वाद आहे.  त्यांचा मतदारसंघ आणि माझा याच्यात काही विषय नाही. ते आक्रमक आहेत तसा मीही आक्रमक आहे.  सोनिया गांधींच्या भेटीची वेळ आमदारांनी मागितली आहे. अनेक ठिकाणी निधीचं समान वाटप होत नाही अशी आमदारांची तक्रार आहे, असं ते म्हणाले.

जिथे पालकमंत्री न्याय देत नाहीत अशा ठिकाणी पालकमंत्री बदल लावायचा आहे की नाही याबद्दल विचार हवा.  विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे, असंही ते म्हणाले.

अडीच वर्ष झाली तेच तेच पालकमंत्री, भाकरी बदलली पाहिजे

त्यांनी म्हटलं की, ज्या मंत्र्यांबद्दल आमदारांना आकस असेल ते सोनिया गांधी यांच्यासमोर सांगतील. आमदाराला सोबत घेऊन जर जात नसतील मंत्री तर बदलले पाहिजेत.  अडीच वर्ष झाली तेच तेच पालकमंत्री, भाकरी बदलली पाहिजे, असंही ते म्हणाले. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget