''भारतात वैद्यकीय उपचार जगभराच्या तुलनेत स्वस्त''; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या संधी
'हॉरीबा' या वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीच्या फॅसिलीटी सेंटरचं आज औपचारीक उद्घाटन नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आलं.
![''भारतात वैद्यकीय उपचार जगभराच्या तुलनेत स्वस्त''; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या संधी Devendra Fadnavis says,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/682381d25e946a05b90813603a925f8417202534738841002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : कोरोना काळात भारताने स्वदेशी लस उत्पादन करत भारताची वैद्यकीय (Medical) क्षेत्रातील ताकद जगाला दाखवून दिली. कोरोना महामारीवरील उपचाराचा डोस ठरलेली कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी भारतात उत्पादीत करण्यात आल्या. विशेष म्हणजे भारताने काही देशांना या लसींचा पुरवठाही केला. त्यामुळे, जगभरात भारताची वैद्यकीय क्षेत्रातील ताकद दिसून आली आहे. त्यातच, भारतातील सर्वात मोठे वैद्यकीय उपकरणे आणि हेमेटोलॉजी अभिकर्मक उत्पादन युनिटचे आज नागपूरात (Nagpur) उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना, भारत देश जगाचं मेडीकल पर्यंटन केंद्र बनतोय, या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं. तसेच, भारतात वैद्यकीय उपचार जगभराच्या तुलनेत स्वस्त आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.
'हॉरीबा' या वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीच्या फॅसिलीटी सेंटरचं आज औपचारीक उद्घाटन नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना फडणवीस यांनी देशातील वाढत्या वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय क्षेत्रातील संधीवर भाष्य केलं. भारत जगाचं मेडीकल पर्यंटन केंद्र बनतोय, या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगत भारतात वैद्यकीय उपचार जगभराच्या तुलनेत स्वस्त आहेत, असेही फडणवीसांनी म्हटले. दरम्यान, भारतातील ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयातून मोफत औषधोपचार होते, तर शहारातील महापालिका व सरकारी रुग्णालयातही मोठ्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. मात्र, खासगी व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी मोठा खर्च करावा लागतो. अनेकदा उपचाराचा खर्च परवडत नसल्याने रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीत, अशीही परिस्थिती उद्धभवल्याची अनेक उदाहरणे आहेत.
सेमी कंडक्टर उत्पादीत करावे
''नागपूरात एकदा आलं की हे शहर तुम्हाला आकर्षित करते, आता सेमीकंडक्टर क्षेत्रात तुम्ही नागपूरात गुंतवणूक लवकरात लवकर करावी, याची आम्ही वाट पाहत आहोत. सेमीकंडक्टर फॅसिलिटीसाठी आम्ही बरीच जागा आरक्षित करुन ठेवली आहे. पुढील काळात या क्षेत्रारातील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी अशी पॉलिसी करण्यात आली आहे, विशेष म्हणजे केंद्र सरकारने देखील याचं कौतुक केलं आहे, असे सांगत हॉरीबा कंपनीला फडणवीसांनी सेमी कंडक्टर उत्पादीत करण्याचं आवाहन केलं आहे. तर, हॅारीबा कंपनी सेमीकंडक्टरचं नागपुरात उत्पादन करणारी पहिली कंपनी असेल, असे म्हणत फडणवीसांनी भविष्यात नागपूरात होणाऱ्या मोठ्या गुंतवणुकीचे आणि रोजगार निर्मित्तीचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)