(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीसांच्या नव्या पेन ड्राईव्ह बॉम्बमधील निवृत्त पोलीस अधिकारी कोण? बारामतीत कोट्यवधींची संपत्ती
Devendra Fadnavis pen drive baramati isaq bagwan news : देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला आणि मुंबई पोलीस दलातील निवृत्त अधिकारी इसाक बागवान यांच्यावर निशाणा साधला.
Devendra Fadnavis pen drive baramati isaq bagwan news : राज्याच्या राजकारणात सध्या पेन ड्राईव्ह बॉम्बची चर्चा आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला आणि मुंबई पोलीस दलातील निवृत्त अधिकारी इसाक बागवान यांच्यावर निशाणा साधला. इसाक बागवान यांच्या भावाचं स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा करत हा पेन ड्राईव्ह त्यांनी गृहमंत्र्यांकडे सादर केला. यात मुंबईतला एक नेता इसाक बागवान यांना बक्षीसपत्र म्हणून जमीन मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे बागवान यांच्या संपत्तीची चर्चा सुरु झालीच, पण फडणवीस यांनी उल्लेख केलेला दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेला तो नेता कोण याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या बारामतीतील संपत्तीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आरोप केले ती संपत्ती नेमकी आहे तरी कोणती अशी उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनुसार इसाक बागवान यांची बारामतीत संपत्ती पुढीलप्रमाणं
- बारामती - इंदापूर रोडवर मधून रिंगरोड गेलेली 42 एकर शेती
- NA प्लॉट सध्याचे बाजारमूल्य 40ते 50लाख रुपये गुंठा...
- बारामती शहरातील फलटण चौक येथे असलेले 30रूम चे लॉजिंग बोर्डिंग A ग्रेड हॉटेल निलम पॅलेस
- रिंग रोडवरील जमिनीत चालू असलेला 225 फ्लॅटची स्कीम
- बारामती भिगवण रोडवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग बंगल्यापासून फक्त 1 मिनिट अंतरावर असलेला 94 गुंठे म्हणजे अडीच एकराचा NA प्लॉट..
बारामतीत 42 एकर बिगरशेती जमीन, अशोक नगर येथे प्लॉट, मळद येथे 27 एकर जमीन तसेच बारामती फलटण रस्त्यावरील नीलम पॅलेस हॉटेल अशी बेहिशेबी मालमत्ता कमावल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :