एक्स्प्लोर

Deepak Kesarkar : "उद्धव ठाकरेंची पोटदुखी वेगळी; सत्ता गेल्याचं त्यांना दुःख; भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला?"

शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला? अशी विचारणा त्यांनी केली.

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे सॅम्पल असा उल्लेख करत केंद्र सरकारने ते परत न्यावे असे सांगत महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपबद्दल जर इतकी पोटदुखी असेल, तर मुंबई पालिकेत पाठिंबा का घेतला? अशी विचारणा त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे वागावे इतकीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान कधीही महाराष्ट्र सहन करणार नाहीय. राज्यपाल यांच्या बद्दलची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केंद्राला कळवली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची पोटदुखी वेगळी आहे. सत्ता गेल्याच त्यांना दुःखं आहे. महाराष्ट्राची जनता ठरवेल की ताकद कमी केली की वाढवली. गेल्या सरकारपेक्षा आम्ही राज्याची ताकद वाढवली आहे. एका क्लिकवर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांना विचाले असता ते म्हणाले की, तुमची सत्ता असताना विधानसभेत सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा प्रस्ताव दिला नाही? इतके तुम्ही लाचार झाला होता, दुर्मिळ झाला होता.

केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरून जोरदार टीका केली. तुमचे चिरंजीव बिहारमध्ये जाऊन लोटांगण घालत असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी महाराष्ट्र दुर्बल झाला हे दिसले नाही का? आमचे सरकार येऊन चार महिने झाले नाही तोवर टीका करायची. तुमचे उद्योग जनतेला माहीत आहे, बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून माणसं आयात करावी लागतात.  आपण विक झाले म्हणून दुसऱ्याला विक म्हणता, अनेक पक्षांचे आधार घेत असल्याचे केसरकर म्हणाले.  

उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा

ज्यांचं सरकार केंद्रात त्यांच्या विचारसरणीची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात, मग त्यासाठी कुवत आणि पात्रता लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल नेमलं जातं का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. केंद्राने हे सॅंपल परत न्यावं अन्यथा त्यांना महाराष्ट्रांचा इंगा दाखवणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वानी एकत्र यावं असं सांगत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचा इशाराही दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget