Ajit Pawar : फक्त महायुतीला साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही, अजित पवारांचा शब्द
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक आमच्यावर टीका करत आहेत. मात्र तुम्ही फक्त साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केलाय.
![Ajit Pawar : फक्त महायुतीला साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही, अजित पवारांचा शब्द dcm Ajit Pawar reaction on ladki bahin yojana progrom in nagpur also Criticized on opponents maharashtra marathi news Ajit Pawar : फक्त महायुतीला साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही, अजित पवारांचा शब्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/31/a95f353e346b03ee72bf067033049eca1725100852705892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News नागपूर : आम्ही वचन पाळणारी लोक आहोत आणि वचनपूर्ती करणारे हे सरकार आहे. आम्ही दिशाभूल करणारे सरकार नाही. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) निमित्याने अडीच कोटी महिलांना या योजनेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे. आता या योजनेत जवळ जवळ 1 कोटी 60 लाख बहिणी लाभार्थी झाल्या आहेत. अजून पुढचे टप्पेही लवकरच होणार आहे. ज्यांच्या अर्ज राहिल्या आहे, त्यांनी अजून ही अर्ज करावे. आम्ही तो लाभ त्यांना देऊ.
मात्र विरोधक या महत्वाकांशी योजनेचे टिंगल टवाळी करत होते. योजनेवर शंका व्यक्त करत होते. हे विरोधक एवढे वर्ष सत्तेत होते, तेव्हा तुम्हाला का नाही सुचले महिलांना मदत करण्याचे? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले काही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. मात्र तुम्ही फक्त महायुतील साथ द्या, लाडकी बहीण योजना कुणी माईचा लाल बंद पाडू शकणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
राज्यात आम्ही 288 जागांवर उभे राहू, त्यावेळी फक्त आशीर्वाद द्या- अजित पवार
लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर पर्यंतचे पैसे तुम्हाला मिळतीलच. मात्र नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होईल. आम्ही तिघे कुठे धनुष्यबाण, कुठे कमळ, तर कुठे घड्याळ या चिन्हावर 288 जागांवर उभे राहू. त्यावेळी तुम्ही महायुतीला भरभरून मतदान करा. मी शब्द देतो, ही योजना आम्ही पुढील पाच वर्ष सुरू ठेवू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. असे आवाहनही अजित पवार यांनी बोलताना केलं आहे.
नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती
नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम होतो आहे. या कार्यक्रमात महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित आहे. या कार्यक्रमात नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने महिला या उपस्थित असून पेंडोल मध्ये बसायला जागा देखील शिल्लक नसल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे शेजारचे सुरेश भट सभागृहात ही महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागली आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)