एक्स्प्लोर

Ajit Pawar : पुढच्या पाच वर्षात महिलांच्या खात्यात 1 लाख जमा करू; अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांची घोषणा

Ajit Pawar : अजित दादा शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होईल. अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Nagpur News नागपूर : भावाच्या नात्यानं तुम्ही जी राखी मला बांधलीय त्या अनुषंगाने तुमचं संरक्षण करणं हे माझं एक भाऊ आणि सरकार म्हणून कर्तव्य आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना 1500 रुपये महिना त्यांना सक्षम करण्यासाठीचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यातून दोन कोटी महिलांच्या खात्यात 1500 रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय. अजित दादा शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होईल. अशी मोठी घोषणा राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली आहे. दरम्यान, काटोलच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींशी आणि शेतकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या वतीने अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला. काटोल हा माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मतदारसंघ असून अजित पवार गट काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठीच अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा काटोल विधानसभा मतदार संघात ठेवली आहे. मात्र दुसरीकडे भाजप पण काटोलच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्यात आज अजित पवार यांची तोफ कडाडली असल्याने या जागेवर त्यांच्या पक्षाने एकप्रकारे शड्डू ठोकला असल्याचे बोलले जात आहे.

संत्रा उत्पादक शेतकर्‍यांसाठी काटोलला कारखाना देणार- अजित पवार

नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार पुढे बोलताना  म्हणाले की, शेतकऱ्यांनी वीज बिलाचे टेन्शन घेऊ नये. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात आले आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांचे जुने बील थकीत आहे त्यावरही विचार सुरु आहे. शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये दुधात अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काटोलला कारखाना देणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांनी फॅार्म भरा. त्यासाठी राष्ट्रवादीने हेल्फलाईन दिलीय त्यांची मदत घ्या. महिला, शेतकरी, कष्टकरी लोकांना मदत व्हावी म्हणून अनेक योजना सरकारने आणल्या आहेत. काटोल इथे पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय. लोकं त्याला चांगला प्रतिसाद देतोय. तब्बल 46 हजार कोटी आम्ही लाडकी बहिण योजनेवर खर्च करणार आहोत. त्यात डायरेक्ट पैसे खात्यात देतोय, त्यात कुठलीही मध्यस्थी नाही. विधानसभा निवडणूक झाल्यावर महायुतीचं सरकार येणार आहे. माय माऊलीं आम्हाला निवडून देणारच आहेत. तर पुढे पाच वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख जमा करू असेही अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget