MBBS in Hindi : भोपाळमध्ये लवकरच हिंदीमध्ये MBBS; महाराष्ट्रात मराठी भाषेत कधी?
MBBS in Hindi : मध्य प्रदेशातील भोपाळच्या गांधी कॉलेजमध्ये MBBS चा अभ्यासक्रम हिंदीमध्ये शिकवला जाण्याचा निर्णय मध्य प्रदेश वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे.
MBBS in Hindi : मध्य प्रदेशमधील भोपाळच्या गांधी मेडिकल कॉलेजमध्ये MBBS हिंदीमध्ये शिकवले जाणार आहे. असा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. हिंदी भाषेतून MBBS चा अभ्यासक्रम शिकवला जाणारे गांधी मेडिकल कॉलेज हे देशातील पहिले मेडिकल कॉलेज असणार आहे. मात्र, आता महाराष्ट्रात मराठीतून MBBS चे शिक्षण कधी सुरु होणार याबाबत प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्रात MBBS चे शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी आहेत. अनेकांना या पदवीचा अभ्यास करताना भाषिक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. नुकताच भोपाळ सरकारने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून MBBSचे वैद्यकीय शिक्षण हिंदीतून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्रात मराठीतून MBBS चे शिक्षण सुरु करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime minister Narendra Modi) यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण स्थानिक भाषांमध्ये करणार असं म्हटलं होतं. मूळ भाषांमध्ये अभियांत्रिकी (Engineering) शिक्षण सुरू करण्याबाबत पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होत की, मला आनंद आहे की आठ राज्यांतील 14 अभियांत्रिकी महाविद्यालये हिंदी-तमिळ, तेलुगू, मराठी आणि बंगाली या पाच भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण सुरू करणार आहोत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे 11 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी एक सॉफ्टवेअरदेखील विकसित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी MBBS कॉलेजेस आहेत. ज्यामध्ये अनेक मराठी मुलं शिक्षण घेतात. त्यामुळं भोपाळच्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठी भाषेत एमबीबीएसचा अभ्यासक्रम सुरु केला जाणार का? याकडे आता लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Lata Mangeshkar Funeral: लतादीदींच्या पार्थिवावर आज सायंकाळी शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]