एक्स्प्लोर
VIDEO : परळीतील गणेशोत्सवात डान्सर सपना चौधरीचे ठुमके
नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या वतीने सपना चौधरीच्या नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

बीड : दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची गर्दी खेचणारी सुप्रसिद्ध डान्सर सपना चौधरीने बीडमध्ये हजेरी लावली होती. नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या वतीने सपना चौधरीच्या नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सपनाचा डान्स पाहण्यासाठी परळीकरांनी तुफान गर्दी केली.
विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सपना चौधरीचा डान्स पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरु असताना चक्क धनंजय मुंडे यांनी प्रेक्षकात जाऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं.
सपना चौधरी 'बिग बॉस'च्या अकराव्या पर्वात सहभागी झाली होती. त्यामुळे हरियाणाची डान्सर असूनही सपना चौधरीचे परळीतही अनेक चाहते असल्याचं पाहायला मिळालं. तरुणांनी तर चक्क मंडपासाठी उभ्या केलेल्या खांबावर चढून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर प्रायव्हेट बाऊन्सरही बोलवण्यात आले होते. अतिउत्साही तरुणांना शांत करण्यासाठी पोलिसांना थोड्या बळाचा वापर करावा लागला. कार्यक्रम सुरु असताना धनंजय मुंडेंनी प्रेक्षकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























