Gokulashtami 2022 : ढाक्कुमाकुम! दहीहंडीची धूम, यंदा नऊ थरांचा विक्रम मोडणार? बक्षीसांसाठी चुरस
Janmashtami 2022 : देशभरात दहीहंडीची धूम पाहायला मिळत आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत.
Dahihandi 2022 : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे.
दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव साजरा
दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे पाहण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते. या उत्सवाची धूम काही वेगळीच असते. रिमझिम पाऊस, उंच आकाशात बांधलेली दहीहंही, रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसणारी गोविंदा पथकं, गाण्यावर ताल धरणारे गोविंदा, मानवी मनोरे असं सगळं चित्र फारच आल्हाददायक असतं. दहीहंडी उत्सवात ज्याप्रकारे गोविंदा पथकांनी लावलेले मानवी मनोरे बघण्यासाठी लाखोंची गर्दी उसळते, त्याचप्रमाणे या दहीहंडी उत्सवात कोणत्या आयोजकाकडे कोणते सेलिब्रिटीज बघायला मिळतील हे बघण्यासाठी देखील तितकीच गर्दी असते. त्यासाठी आधीपासूनच प्रमोशन देखीलल सुरू करण्यात येते.
यंदा नऊ थर लावण्याचा विक्रम मोडणार?
एक,दोन तीन, चार , पाच अशा थरांचा थरार या दहीहंडी उत्सवात पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे... जास्तीत जास्त थर लावता येतील यासाठी मागील दोन महिन्यापासून मुंबईतलं नावाजलेला 'जय जवान' गोविंदा पथक या भर पावसात सुद्धा दहीहंडी साठी खास तयारी करत आहे... कारण याच गोविंदा पथकानं आतापर्यंत सर्वाधिक 9 थर लावण्याचा विश्वविक्रम केला आहे...शिस्त, सातत्य, मेहनत या बळावर दरवर्षी गोविंदा पथक विशेष छाप पाडतय... त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सुरू असलेल्या सरावात सुद्धा या पथकाने चार वेळेस नऊ थर लावले आहेत... त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा उत्तराचा आपलाच विश्वविक्रम मोडीत काढणार का ? याची उत्सुकता प्रत्येकाला असेल.
गोविंदा पथकं सज्ज
जय जवानच नाही तर मुंबई ठाण्यातील 200 पेक्षा अधिक गोविंदा पथक सुद्धा अशाच प्रकारे सराव करत आपला उत्साह वाढवताय.. कारण दोन वर्षांनंतर जेव्हा अशाप्रकारे थाटामाटात दहीहंडी उत्सव होतोय तेव्हा आधीपेक्षा अधिक थोर लावण्यासाठी प्रत्येक गोविंद पथक प्रयत्न करणार आहे... कारण तशा प्रकारची भरगोस बक्षीस सुद्धा आयोजकांनी ठेवल्याने त्याचे विशेष आकर्षण असणार आहे
ठाण्यात कुठे कुठे दहीहंडी उत्सवाचा विशेष आकर्षण असणार
1) ठाणे - संस्कृती युवा प्रतिष्ठान
आयोजक - आमदार प्रताप सरनाईक
बक्षीस- 10 थरांसाठी - 21 लाख
9 थरांसाठी - 11 लाख
8 थरांसाठी - 50 हजार
2) ठाणे -मनसे दहीहंडी उत्सव - आयोजक - मनसे नेते अविनाश जाधव
बक्षीस - 10 थरांसाठी - 21 लाख
9 थरांसाठी - 11 लाख
3) ठाणे - भाजप पुरस्कृत स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव- आयोजक- शिवाजी पाटील
बक्षीस- 9 थरांसाठी - 11 लाख
8 थरांसाठी - 25हजार
7 थरांसाठी- 10 हजार
4) ठाणे - शिवसेना टेंभी नाका मानाची हंडी - मार्गदर्शक- मुख्यमंत्री एकणाथ शिंदे
बक्षीस- सर्वाधिक थर लावल्यास मुंबई ठाणे गोविंदा पथक आला प्रत्येकी दोन लाख 51 हजार रुपये
महिला गोविंदा पदकासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस