एक्स्प्लोर

गौतमीला खुन्नस देणाऱ्या राधाच्या अदा, मुंबईकर फिदा; कोण आहे घायाळ करणारी नृत्यांगणा?

मुंबईची दहीहंडी (Dahihandi) म्हणजे देशभर चर्चा असते, गोविंदा पथकांचे थरावर थर.. अनेक थर.. आणि लक्षावधी बक्षिसांचेही मनोरे मुंबईत पाहायला मिळतात.

मुंबई : सबसे कातिल गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलला टस्सल देण्यासाठी नवी नृत्यांगणा यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात ठुमके देत आहे. ठाण्यातील मागाठाणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दहीकाला गोविंदोत्सव 2024 येथे राधा मुंबईकरने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केल्याचं पाहायला मिळालं. आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीन आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवात राधाने उपस्थित मुंबईकरांची मने जिंकली. दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी, हिंदी गाण्यांवर ठुमके देत राधा मुंबईकरने दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींनाही मागे टाकल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गतवर्षी गौतमी पाटीलने मुंबई गाजवली होती. यंदा राधाने मुंबईचा दहीहंडी उत्सव गाजवल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईची दहीहंडी (Dahihandi) म्हणजे देशभर चर्चा असते, गोविंदा पथकांचे थरावर थर.. अनेक थर.. आणि लक्षावधी बक्षिसांचेही मनोरे मुंबईत पाहायला मिळतात. मुंबईकरांसाठी दहीहंडीचा दिवस म्हणजे फुल्ल टू एन्जॉय हॉलिडेच असतो. कारण, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील ठाणे, घाटकोपर, मुंबई (Mumbai) येथील प्रसिद्ध दहीहंडी पाहायला लोकं येतात. या लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक सेलिब्रिटीही दहीहंडी उत्सवात असतात. मात्र, गेल्या वर्षीपासून येथील दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलची (Gautami patil) एन्ट्री झाली अन् थोडसं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींची जागाच लावण्यखणी नृत्यांगणांनी घेतली. गतवर्षी मुंबईत आलेल्या गौतमीने आनंद व्यक्त केला होता. तसेच, मंबईकरांचं हे प्रेम पाहून मी भारावले, यापुढे ही मुंबईत बोलावलं की मी येणार असं तिने म्हटलं होतं. मात्र, यंदा मुंबईतील दहीहंडीत दिसून आली ती राधा मुंबईकर. पाव्हणं तुम्ही या.. यांसह अनेक गाण्यांवर राधा थिरकली. विशेष म्हणजे राधाच्या अगोदर गौतमीही इथेच नाचली होती. 

मी मुंबईकर आहे, तुमची मुंबईकर म्हणूनच मी महाराष्ट्रभर फिरताना राधा मुंबईकर हे नाव लावते. मला तुमचा सपोर्ट पाहिजे, मला सपोर्ट करणार का, असे म्हणत ठाण्यातील दहीहंडी उत्सवात राधा पाटील हिने मुंबईकरांचा पाठिंबा मागितला. तसेच, आपण महाराष्ट्रात नक्कीच नंबर १ येणार, असे म्हणत गौतमी पाटीलला फुल्ल खुन्नस दिल्याचं दिसून आलं. भरजरी साडी अन् पाठमोऱ्या दिलखेचक अदांनी राधा मुंबईकरने आज मुबंईत आपल्या चाहत्यांना खुश केलं. तसेच, मुंबईतील चाहत्यांना राधावर फिदा व्हायला भाग पाडलं हेच दिसून आलं.

कोण आहे राधा मुंबईकर

राधा मुंबईकर हिचं खरं नाव राधा पाटील असून ती मूळ मुंबईकर आहे. म्हणूनच ती राधा मुंबईकर या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम घेते. तिचा जन्म देखील मुंबईचा आहे. राधा मुंबईकर याच नावाने तिचे इंस्टाग्राम अकाऊंटदेखील आहे. सध्या ती गौतमी पाटीलला टक्कर देत पुढे येत आहे. म्हणूनच, गौतमी पाटीलच्या नावाचा वाद पुढे आला तेव्हा राधाने गौतमीवर बोचरी टीका केली होती. ''कलेशी प्रामाणिक राहून नृत्य केलं की नाव होतंच. गौतमी चांगलं नाचते. शेवटी आपण कसा डान्स करायचा ही ज्याची त्याची इच्छा असते. मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काय माहीत नाही. मी तर खानदानी पाटील आहे. पाटील असल्याचे सगळे पुरावे देऊ शकते,'' अस राधा पाटील हिने म्हटलं होतं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Divyang Kalyan Yojana: मोठी बातमी! दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी शासनाकडून घसघशीत अर्थसहाय्य; टूलकिट खरेदीसाठी तीन दशकानंतर रकमेत 15 पट वाढ
मोठी बातमी! दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी शासनाकडून घसघशीत अर्थसहाय्य; टूलकिट खरेदीसाठी तीन दशकानंतर रकमेत 15 पट वाढ
Ajit Pawar: अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर झाले मंजूर, नेमकं काय प्रकरण?
अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर झाले मंजूर, नेमकं काय प्रकरण?
Shivsena Shinde Group Candidate For Rajya Sabha Election 2026: एक नाव निश्चित होताच, दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिवसेना शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश
एक नाव निश्चित होताच दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश

व्हिडीओ

Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Embed widget