Konkan News : कोकणात पावसाचा अंदाज, 'मंदोस' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम
हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या कोकणात (Konkan) पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंदोस चक्रीवादळाचा परिणाम कोकणात जाणवत आहे.
Konkan News : बंगालच्या उपसागरात 'मंदोस' चक्रीवादळ (Mandos Cyclone) निर्माण झालं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर (Konkan Coast) परिणाम जाणवू शकतो. हवामान विभागानं (India Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या कोकणात (Konkan) पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे.
मंदोस चक्रीवादळामुळं तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरीमध्ये (Puducherry) मध्यम ते जोरदार पावसाचा (Rain) अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आज (8 डिसेंबर) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडीचा रोज कमी होणार
चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीवर परिणाम होणार आहे. राज्यात असणारा थंडीचा जोर कमी होणार आहे. थंडीला कदाचित आठवडाभरच अटकाव होण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळं थंडीचा जोर कमी होणार आहे.
तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर शुक्रवारी 12 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता आहे. तमिळनाडूतील तिरुवरूर आणि तंजावर जिल्ह्यात पावसाच्या इशाऱ्यामुळं आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या स्थितीमुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुसरीकडं हे मंदोस चक्रीवादळ पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे. याचे हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होत आहे. आज हे वादळ नैऋत्य बंगालचा उपसागर, उत्तर तामिळनाडू-पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनार्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर ते तामिळनाडू, पुद्दुचेरी ओलांडून 10 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: