ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड, 5000 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची हैदराबादमध्ये मोठी कारवाई
मीरा भाईंदर (Mira Bhayandar) वसई विरार पोलिसांनी हैदराबादमध्ये मोठी कारवाई केली आहे. हैदराबादमध्ये छापा मारुन पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड केला आहे.
Crime News : मीरा भाईंदर (Mira Bhayandar) वसई विरार पोलिसांनी हैदराबादमध्ये मोठी कारवाई केली आहे. हैदराबादमध्ये छापा मारुन पोलिसांनी ड्रग्स फॅक्टरीचा भांडाफोड केला आहे. आज (5 सप्टेंबर 2025) कारवाई करण्यात आली आहे. मीरा रोडमधील एमडी ड्रग्सच्या एका प्रकरणात तपास सुरू असताना हैदराबाद कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने 14 पोलिसांना सोबत घेऊन हैदराबाद येथे छापेमारी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची एकूण किंमत 5000 कोटी असल्याची माहिती मिळाली आहे.
केमिकल व ड्रग बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त
या छापेमारीमध्ये हैदराबादमध्ये एमडी बनवणाऱ्या कारखान्यावर छापा मारला आहे. छापेमारी दरम्यान एमडी ड्रग्ससह त्यासाठी लागणारे इतर केमिकल व ड्रग बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखाना मालकास पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. रचकोंडा येथील चेरलापल्ली एमआयडीसीमध्ये मीरा भाईंदर पोलिसांनी हा मोठा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला. तेलंगणातील ड्रग्जची एकूण किंमत सुमारे 5000 कोटी आहे.
महत्वाच्या बातम्या:























