Maharashtra Covid 19 Case: राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख चढताच! निर्बंध वाढवण्याची शक्यता
राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. यामुळे भविष्यात निर्बंध वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज (28 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 293 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 3753 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 77 हजार 008 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.
विदर्भात कोरोनाचा उद्रेक राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.
Maharashtra reported 8,293 new COVID-19 cases, 3,753 recoveries, and 62 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 21,55,070 Total recoveries: 20,24,704 Death toll: 52,154 Active cases: 77,008 pic.twitter.com/WS6UAByWLv — ANI (@ANI) February 28, 2021
सध्या देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच रुग्ण संख्या वाढत असताना एक समाधानकारक बाब समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार चाळी आणि झोपडपट्ट्यांमधून कमी झाल्याने त्या कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत. मुंबईत सध्या फक्त 13 झोडपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट झोनमध्ये आहेत. मुंबईमधील इतर सर्व झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत.
मुंबईतील झोपडपट्ट्या कोरोनामुक्तीकडे गेल्या 11 महिन्यात 2742 चाळी आणि झोपडपट्ट्या कन्टेन्मेंट झोन मुक्त झाल्या आहेत. मुंबईमधील 60 टक्के नागरिक झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये राहतात. या झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट मुक्त झाल्याने झोपड्पट्टीवासीयांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईमध्ये गेले अकरा महिने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. मात्र, फेब्रुवारीत पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात असताना एक समाधानकारक बाब समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार चाळी आणि झोपडपट्ट्यामधून कमी झाल्याने त्या कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत. मुंबईत सध्या फक्त 13 झोडपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट झोनमध्ये आहेत. मुंबईमधील इतर सर्व झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत.