एक्स्प्लोर
सोलापुरात तीन वर्षांच्या मुलीसह दाम्पत्याची आत्महत्या
सतीश बंदीछोडे हे पुण्यातल्या खाजगी कंपनीत नोकरीला होते. 16 वर्षांपूर्वी ते पुण्यात स्थायिक झाले होते. रविवारी मूळ गावी येऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली.
सोलापूर : दाम्पत्याने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरगावातील ही घटना आहे.
सतीश बंदीछोडे (वय 36), अंदवा बंदीछोडे (वय 25) आणि वेदिका (वय 3) अशी मृतांची नावे आहेत.
सतीश बंदीछोडे हे पुण्यातल्या खाजगी कंपनीत नोकरीला होते. 16 वर्षांपूर्वी ते पुण्यात स्थायिक झाले होते. रविवारी मूळ गावी येऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली.
बंदीछोडे दाम्पत्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांनी ही घटना उघडकीस आली. संदीप झाडाला लटकलेल्या अवस्थेत होते, तर मायलेकीचे मृतदेह त्यांच्या जवळ आढळले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अक्कलकोट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पोलिसांच्या तपासानंतर याबाबत माहिती समोर येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement