(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | राजस्थान, पंजाबनंतर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होण्याची शक्यता
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो.
मुंबई : राजस्थान आणि पंजाबनंतर संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेऊ शकतात. गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाऊ शकतो.
मुख्यमंत्रई उद्धव ठाकरे विविध खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेत आहे. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडायची असेल तर सोशल डिस्टन्स खूप गरजेचा आहे. भारतात सध्या कोरोना व्हायरस दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र तिसऱ्या टप्प्यात ती स्थिती बिघडू शकते. हाच धोका रोखण्यासाठी कठोर पावलं उलण्यास राज्य सरकार सज्ज असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईतील लोकल सेवा बंद
मुंबईतील लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 31 मार्चपर्यंत लोकल वाहतूक बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर देशभरातील रेल्वेतील गर्दी लक्षात घेत रेल्वे मंत्रालयानेही रेल्वेसेवाही मध्यरात्रीपासून बंद करण्याची घोषणा आहे. 31 मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेतलाय. सर्व मेल, एक्स्प्रेस, इंटरसिटी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
CoronaVirus | मुंबई कोरोनाचा दुसरा बळी, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 64 वरुन 74 वर
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा - 15
- मुंबई - 24
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 3
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- रायगड - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
संबंधित बातम्या :