एक्स्प्लोर
सांगलीतील इस्लामपूरमधील पहिल्या चार कोरोनाबधितांसह 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित चौघा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग, प्रशासन आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगली - सांगलीच्या इस्लामपूर मधील 'त्या' पहिल्या चार कोरोना बधितांसह 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधितांसह 15 जणांचे स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यामध्ये 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यामुळे प्रशासान आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगलीच्या इस्लामपूर येथील चार जण सौदी अरेबिया येथून उमराह या देवदर्शन यात्रा करून 14 मार्च रोजी परतले होते. त्यानंतर या चौघांना 19 मार्च रोजी प्रशासनाने ताब्यात घेत मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल केले. त्यानंतर या चौघांना कोरोना लागण झाल्याचे रिपोर्ट आल्याने संपूर्ण जिल्हा आणि प्रशासन हादरून गेले होते.
तर 14 ते 19 मार्च दरम्यान त्या चार जणांच्या संपर्कामध्ये सुमारे 400 हुन अधिक जण आल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली होती.त्यानंतर तातडीने या सर्वांचा शोध घेऊन यातील संशयित आणि जवळच्या संपर्कात असणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन काही जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन तर अनेकांना होम क्वारटाईन करण्यात आले होते. यानंतर त्यापैकी त्यांच्या कुटुंबातील जवळच्या 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील एक महिलेच तर दोन वर्षाच्या बाळासह एका लहान मुलीचा समावेश होता. या सर्व 26 जणांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कोरोना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते. यापैकी सौदी अरेबियामधून जे पाहिले चार जण आले होते. ज्यांच्यामुळे कोरोनाची साखळी तयार झाली होती. त्यांची शनिवारी 14दिवसांचा उपचार कार्यकाळ पूर्ण झाल्याने आरोग्य विभागाकडून स्वॅब टेस्ट घेण्यात आली. त्या चौघांचे टेस्ट रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 24 तासानंतर या चौघांची आणखी एक टेस्ट घेण्यात येणार असून ती टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांना डिस्चार्ज करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तर त्या चौघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 11 जणांचे स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये 10 जणांचे रिपोर्ट हे सुद्धा निगेटिव्ह आले आहेत.
तर जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित चौघा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग, प्रशासन आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर या चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सांगलीच्या कोरोना रुग्णांचा आकडा आता घटून 21 झाला आहे. सांगली जिल्हा हा कोरोना मुक्तीच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement