एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | अत्यावश्यक सेवा सोडून राज्यातील सरकारी कार्यालयं 7 दिवसासाठी बंद, मंत्रीमंडळाचा निर्णय झाल्याची मंत्री आव्हाडांची माहिती
Coronavirus चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारने आज अत्यावश्यक सेवा सोडून राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं 7 दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत दिलीय.
मुंबई : Coronavirus चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारने आज अत्यावश्यक सेवा सोडून राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं 7 दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद असली तरी अत्यावश्यक सुविधा असलेली कार्यालये सुरु राहतील. जी कार्यालयं कोरोनाच्या संदर्भात प्रत्यक्ष काम करत आहेत ती सर्व कार्यालयं सुरु राहणार असल्याची देखील माहिती आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील यासंबंधी ट्वीट केलं आहे.
सरकारी कार्यालये बंद असली तरी सरकारी कर्मचारी परवानगीशिवाय शहराच्या बाहेर जाणार नाहीत. त्यांची गरज कधीही लागू शकते. शहर सोडून जाणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी देखील माहिती मिळाली आहे.
तर कोरोनाचा आज एक नवा रुग्ण आढळून आला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 40 झाली आहे. मुंबई येथे आज एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. तो US वरुन आल्याची माहिती आहे.
Coronavirus | मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार : राजेश टोपे
Coronavirus | असंवेदनशीलता... रुग्णालयात कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी नेण्यास नकार, तरुणाचा उपचाराविना मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement