Coronavirus: कोरोना आणि गोवरसाठी 'पंचसूत्री', जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला राज्य सरकारचे आदेश
Coronavirus: प्रत्येक आरटीपीसीआर बाधित नमुना जीनोम सिक्वेन्सीसाठी पाठवावा... याकरिता राज्यात सात प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
Coronavirus: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. ओमायक्रॉनचा (Omicron) सबवेरियंट BF.7 मुळे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर भारतातही खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्रीय स्तरावर आज बैठक झाल्यानंतर राज्य सरकारही अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. कोरोना आणि गोवर संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाची आज बैठक झाली, यामध्ये राज्यातील महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला पंचसूत्री राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय इतर अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.
जिनोम सिक्वेन्सिंगसाठी राज्यात सात प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रत्येक आरटीपीसीआर चाचणीतून कोरोना बाधित नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोरोना नियम या पंचसूत्रीचा वापर करावा. तसेच प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेनं आरटीपीसाआर चाचण्या वाढवाव्यात, असं सांगण्यात आलेय. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट- ट्रॅक- ट्रिट -वॅक्सिनेट आणि कोव्हीड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रत्येक आरटीपीसीआर बाधित नमुना जीनोम सिक्वेन्सीसाठी पाठवा, आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरवर आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना संदर्भात चीन, जपान, अमेरिका, कोरीया आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये रुग्णसंखेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा शल्य चिकित्सक ,आरोग्य अधिकारी मनपा आणि राज्यातील सर्व आरोग्य मंडळाचे उपसंचालक यांची बैठक घेतली. राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत असून या आठवड्यात मागील आठवड्याचे तुलनेत नवीन रुग्ण संख्या 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. जगातील काही देशांमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील आदेश आरोग्य मंत्री व प्रधान सचिव यांनी दिले आहेत.
सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, वॅक्सिनेट आणि कोव्हीड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रत्येक जिल्हा /मनपा ने आपले टेस्टिंग वाढवावे टेस्ट मधील आरटीपीसीआर चे प्रमाण वाढवावे, असे सांगण्यात आलेय.
बैठकीत नेमकं काय सांगण्यात आले?
प्रत्येक आरटीपीसीआर बाधित नमुना जीनोम सिक्वेन्सीसाठी पाठवावा... याकरिता राज्यात सात प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात जिनोम सिक्वेन्सिंग साठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जिनोम सिक्वेसिंग अधिक वेगाने होईल याची खात्री जमा करावी.
चीनमधील बीएफ.7 पूर्वी भारतात आढळला आहेत त्यामुळे या व्हेरीयंट मुळे भीती बाळगण्याची गरज नसली तरी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे.
यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचाही जिल्हानिन्याय आढावा घेण्यात आला आणि प्रिकॉशन डोस कडे अधिक लक्ष देण्याच्या आदेश सर्वांना देण्यात आले आहे.
सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत सरकारच्या समन्वयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या स्क्रीनिंग बाबत योग्य निर्णय घेण्यात येईल.