Coronavirus In India: केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, चीनमधून येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावर होणार कोरोना चाचणी
Coronavirus In India: चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. ओमायक्रॉनच्या (Omicron) सबवेरियंट BF.7 मुळे चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.
Coronavirus In India: चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. ओमायक्रॉनच्या (Omicron) सबवेरियंट BF.7 मुळे चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. याचाच आता भारतातही परिणाम दिसू लागला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर बैठक घेतली. या बैठकीनंतर आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. आता चीनमधून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची विमानतळावर तपासणी केली जाईल.
चीनमधून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. सरकार पूर्णपणे सतर्क असून आजपासून म्हणजेच बुधवारपासूनच विमानतळावर तपास सुरू करण्यात आला आहे. आजपासून देशातील विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे नमुने घेण्यासही सुरुवात झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
चीनमध्ये कोरोनाची (Corona In China) प्रकरणे वाढवण्यासाठी जबाबदार असलेल्या ओमायक्रॉन सबवेरियंट BF.7 ची तीन प्रकरणे भारतातही आढळून आली आहेत. गुजरातमध्ये दोन आणि ओडिशातील एक प्रकरण समोर आले आहे. यामुळेच भारत सरकार कोरोनाबाबत पूर्णपणे सतर्क झाले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनीही बुधवारी सांगितले की, कोरोना अद्याप संपलेला नाही. यातच केंद्रीय मंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल (Dr. VK Paul) यांनी लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले. भारतातील पात्र लोकसंख्येपैकी केवळ 27-28 टक्के लोकांनी कोविड-19 साठी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे हे लक्षात घेऊन, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी गर्दीच्या ठिकाणी लसीकरण करून मास्क वापरण्याचा सल्ला दिला. पॉल म्हणाले, "लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावे. ज्यांना आधीच आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे."
चीनमध्ये 15 लाख रुग्णाचा मृत्यू
दरम्यान, चीनमध्ये कोरोनामुळे (Corona In China) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 'द इकॉनॉमिस्ट'मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार, लोकांना संसर्ग होण्याचे प्रमाण आणि इतर परिस्थितीच्या अभ्यासावर आधारित सुमारे 15 लाख चिनी नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे आकडे पाहता असं लक्षात येत की, चीनमध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर 13 लाख ते 21 लाख लोकांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतो.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातम्या: