कोरोना पॉझिटिव्ह असल्यास 5 दिवस गृहविलगीकरणात राहा, टास्क फोर्सचा सल्ला, लवकरच नियमावली
Coronavirus Maharashtra Latest News मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालेय.
Maharashtra Coronavirus News Today : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus ) संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालेय. टास्क फोर्सच्या (task Force) सल्ल्यानुसार राज्या सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांनी पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने दिला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं समजतं. परदेशातून भारतात येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती मिळतेय.येणाऱ्या सणांच्या काळात पुढील तीन आठवडे महत्त्वाचे असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यांमधील रुग्णालय सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही टास्क फोर्सनं सांगितलंय. दरम्यान राज्यात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 863 वर पोहोचली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. आज राज्याच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्ण विलगीकरण करण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिली आहे. रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास घरीच 5 दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिलाय. नवं वर्ष अन् सणासुदीच्या काळामुळे पुढील तीन आठवडे महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांमधील हॉस्पिटलायझेशनकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्सने म्हटलेय.
राज्यात कोरोनाची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 862 वर -
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात 138 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 75 रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळं राज्यातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाणं हे 98.17 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 862 वर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण ठाण्यात आहेत.ठाण्यात कोरोनाचे 237 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये 138 आणि पुण्यात 136 सक्रीय रुग्ण आहेत.
32 जेएन.1 सब व्हेरियंटचे रुग्ण -
राज्यातील एकूण जेएन.1 कोरोना रुग्णांची संख्या 32 वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात जेएन.1 सबव्हेरियंटचे 17 रुग्णांची नोंद आहे. तर ठाण्यात पाच रुग्णांची नोंद आहे. बीडमध्ये तीन आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन रुग्णांची नोंद आहे.
शंभरहून अधिक रुग्ण आढळले -
राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 862 वर पोहचली आहे. बुधवारी राज्यात 138 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले. मुंबईमध्ये 20 रुग्ण आढळले. नवी मुंबई 11, नाशिक 10, पुणे शहर 9, पिंपरी चिंचवड 9 रुग्ण आढळले आहेत.