एक्स्प्लोर
सोलापूर शहरासह आजूबाजूच्या काही गावांत 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन
लॉकडाऊनच्या काळात फक्त रुग्णालय, मेडिकल, डेअरी सुरु राहणार आहेत. या शिवाय पोलिस प्रशासनाचे दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर : सोलापुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे सोलापूर शहरात आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जूलैपर्य़ंत लॉकडाऊन लागू असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्याची कोरोना विषयक आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत शहरातील कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात यावा का या विषयी चर्चा कऱण्यात आली. या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यां समवेत शहारातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदार देखील उपस्थित होते. यावेळी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे लॉकडाऊन संदर्भात सविस्तर प्लॅन तयार करण्याचे काम पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवले. यावर आज दिवसभरात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आपआपल्या कार्य़ालयात पार पडल्या. त्यानंतर पुन्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली.
या बैठकीनंतर सोलापूर शहर आणि शहरालगतच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे अशा गावातही लॉकडाऊन लागू करणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. या लॉकडाऊनच्या काळात फक्त रुग्णालय, मेडिकल, डेअरी सुरु राहणार आहेत. या शिवाय पोलिस प्रशासनाचे दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. या शिवाय सर्व आस्थापना बंद राहणार असल्याची माहिती दिली आयुक्तांनी दिली. भाजीपाला, किराणा, इत्यादी अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी 5 दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये असे आवाहन पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी यावेळी केले.
#Lockdown राज्यातला लॉकडाऊन उठवा,व्यवहार पूर्ववत करण्याची भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धेंची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement