एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | राज्यपाल, राजभवनातील कर्मचारी एक दिवसाचे वेतन, तर राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार
राज्यपाल, राजभवनातील कर्मचारी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार, तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत.
मुंबई : कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आता मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा केली आहे. राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधाला देणार आहेत. राज्यपाल आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राज्यपालांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 21 दिवसांच्या संचारबंदीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 14 एप्रिलपर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या कालावधीत जनतेच्या भेटी देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यपाल आपल्या कर्तव्य पालनाकरता आवश्यक अभ्यागत तसेच अधिकाऱ्यांना या कालावधीत भेटतील, असं आज राजभवनातून आज जाहीर करण्यात आले.राष्ट्रवादी आमदार-खासदार आपलं एक महिन्याचं वेतन देणार
राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि सर्व खासदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली.
राज्यातील जिल्हा आणि महापालिकानिहाय रुग्णांची आकडेवारी- मुंबई - 49
- पिंपरी चिंचवड - 12
- पुणे - 18
- सांगली - 13
- नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली - 6
- नागपूर - 5
- यवतमाळ - 4
- अहमदनगर - 3
- ठाणे - 3
- सातारा - 2
- पनवेल - 2
- कोल्हापूर -2
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद -1
- रत्नागिरी - 1
- वसई-विरार - 1
- पुणे ग्रामीण - 1
- सिंधुदुर्ग - 1
- मृत्यू - 4
संबंधित बातम्या :
- Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार
- आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच, गरिबांना 1.70 कोटींचं पॅकेज : अर्थमंत्री
- Coronavirus | राज्यातील 15 रूग्ण कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- Corona helpline numbers | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी जारी
- Coronavirus | कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढाईत बळ देणारा व्हिडीओ; नागपुरमधील कोरोनाग्रस्ताचा अनुभव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement