एक्स्प्लोर

LIVE UPDATES | मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ

एकही काळा कपडा नको, कर्नाटक सरकारची बेळगावात दमदाटी, तर महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून काम करणार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि मुश्रीफांमध्ये वाग्युद्ध साताऱ्यातील दोन 'राजें'मधला संघर्ष मिटला! खासदार उदयनराजे-रामराजे नाईक निंबाळकरांची खास भेट! बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचं निधन, आज पोहरागड येथे अंत्यसंस्कार RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर पाच गडी राखून पराभव दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

LIVE UPDATES | मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ

Background

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

'भाजप व्यक्तीनिर्भर नाही, कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा पक्ष', खडसेंच्या सोडचिठ्ठीवर गिरीश महाजनांचं भाष्य

एकनाथ खडसेच काय तर मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या सात ते आठ नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही पक्षाला कोणत्याही प्रकारचा फरक पडला नव्हता. भाजपकडून मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर ही नेतेमंडळी पक्ष सोडून निघून गेली होती. नंतर पक्षात परत देखील आली होती. भाजप हा पक्ष व्यक्तीनिर्भर नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा आहे, अशा शब्दात भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवर पलटवार केला.

भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार पलटवार केला. खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडत आहेत. सध्या खडसे आणि महाजन यांच्यातही शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना 'पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे, कुणाच्या मागे किती लोक आहेत, हे चित्र दिसेलच', असे वक्तव्य केले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ; मुंबईत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण, व्हिडीओ व्हायरल

मुंबईत लोकल अद्याप सर्वांसाठी खुली करण्यात आलेली नसल्यामुळे बेस्टवर प्रचंड ताण येत होता. अशातच बेस्टच्या मदतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एसटीच्या विविध विभागातून एसटी बसेस आणि सोबत त्या-त्या भागांतील एसटीचे काही कर्मचारी देखील सध्या मुंबईत सेवा देण्यासाठी हजर राहिले आहेत. मुंबईत आलेल्या या एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केल्याचा दावा एसटी प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. असं असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावर झोपावं लागत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा देखील निकृष्ठ असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत सर्व पूर्ववर्त करण्यासाठी बेस्ट सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्ट सेवेवर संपूर्ण ताण पडत होता. त्यामुळे राज्यांतील प्रमुख एसटी बस डेपोमधून काही बसेस या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. या सर्व बसेससोबत एसटी कर्मचारीही मुंबईत दाखल झाले आहेत. या कर्मचाऱ्यांची सोय अगदी उत्तम केल्याचा दावा सातत्यानं एसटी प्रशासन करत आहे. परंतु, सोशल मीडियावर एसटी कर्मचाऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या जेवणासंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे एसटी प्रशासनाच्या दाव्यां संदर्भात प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत निधी दिला : अशोक चव्हाण

शिवसेनेसोबत जाण्याबाबत दिल्लीतील नेते नाराज होत, मात्र राज्यात भाजपकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे मी स्वतः जाऊन त्यांना भाजपला सत्तापासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागेलच हे पटवून दिल्याने आपण महाविकास आघाडीत सामील झाल्याचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले. महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री यांच्याकडून निधी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र मी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेलेचं खड्डे बुजवण्याचे काम सध्या मला आहे, तेच मी करतोय. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते झाले पाहिजेत यासाठी मी विमानाने नाहीतर कारने जास्त फिरतोय, असा सणसणीत टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना परभणीत लगावला आहे.

IPL 2020, RRvs KXIP: राजस्थान रॉयल्सने पंजाबचा विजयरथ रोखला; प्ले ऑफसाठीची चुरस वाढली

राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेलं 185 धावांचं आव्हान राजस्थानने 17.3 षटकात पूर्ण करत मोसमातील सहावा विजय साजर केला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने सुरुवातीला केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 26 चेंडूत 50 धावा केल्या तर संजू सॅमसनने 25 चेंडूत 48 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 23 चेंडूत 30, स्टीव्ह स्मिथने 20 चेंडूत तर जोस बटलरेने 11 चेंडूत 22 धावा केल्या.

त्याआधी किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 186 धावांचे लक्ष्य दिले. पहिल्याच षटकात सलामीवीर मनदीपसिंग खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने त्याला माघारी धाडलं. पंजाबची सुरुवात खराब झाली. त्यानंतर केएल राहुल आणि ख्रिस गेलने दुसर्‍या विकेटसाठी 120 धावांची मजबूत भागीदारी केली. राहुलने 41 चेंडूत 46 धावा केल्या. राहुलने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले.. तर पंजाबकडून ख्रिस गेलने 63 चेंडूत 99 धावांचे तुफानी खेळी केली. गेलने या खेळीत आठ षटकार आणि सहा चौकार लगावले. त्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरनने अवघ्या 10 चेंडूत 22 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन षटकार लगावले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने चार षटकांत 26 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. तर बेन स्टोक्सने चार षटकांत 32 धावा देऊन दोन बळी घेतले.

 

 

19:42 PM (IST)  •  01 Nov 2020

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये पुन्हा एकदा करण्यात आली वाढ. आजपासून 2020 फेऱ्या सुरू केल्यानंतर, उद्यापासून त्यात आणखीन वाढ करून 2773 फेऱ्या चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर 552 तर पश्चिम रेल्वेवर 201 फेर्यांची वाढ करण्यात आली. असे करून रेल्वे आता राज्य सरकारवर लवकर निर्णय घ्यायचा दबाव टाकत आहे. रेल्वेने दिलेल्या अभिप्राय वर राज्य सरकारने लवकरात लवकर उत्तर द्यावे असेही रेल्वेने सांगितले आहे.
19:35 PM (IST)  •  01 Nov 2020

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कारचा टायर फुटल्याची घटना आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणगाव ते अमळनेर रस्त्यावर घडली. कारचा टायर फुटल्यानंतर कार चालकाने वेगावर नियंत्रण मिळवल्याने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. खडसे या अपघातातून बालंबाल बचावले.
18:19 PM (IST)  •  01 Nov 2020

लष्करामध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून शारीरिक चाचणी घेतली होती. फेब्रुवारीत चाचणी घेतल्यानंतर आज वानवडीच्या एआयपीटीच्या मैदानावर लेखी परीक्षा घेतली. या प्रकरणात राजस्थानच्या एजंटसह लष्करातील एका लीपीकाला अटक करण्यात आली आहे. परीक्षेला आलेल्या 30 उमेदवारांकडून 3 ते 4 लाख घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बनावट भरती रॅकेटमधील इतर संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे.
17:19 PM (IST)  •  01 Nov 2020

गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गप्पू गुप्ता यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केले असताना आता राष्ट्रवादी कांग्रेसला गळती सुरू झाली असून राष्ट्रवादीचे उच्च पदाधिकारी असलेल्या 48 लोकांनी काँगेस मध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांच्या बाल किल्यात गळती सुरू झाली आहे,यात आजी माजी ग्राम पंचायत सदस्य .जिल्हा परिषद सदस्य यांचा देखील समावेश आहे
17:45 PM (IST)  •  01 Nov 2020

पुण्यातील गड-किल्ल्यांवर जाण्यास आणि गिर्यारोहण, ट्रेकिंग करण्यास पुणे प्रशासकीय यंत्रणेने परवानगी दिली आहे. अटी व शर्ती नियम लागू करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही परवानगी दिलीय. अटी शर्ती एका ग्रुपमध्ये पंधरा गिर्यारोहकांपेक्षा जास्त नसावेत. ट्रेकिंग करताना प्रत्येक ट्रेकर्ससाठी मास्क बंधनकारक. ट्रेकिंग करताना सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक दहा वर्षाच्या आतील तसेच 65 वर्षाच्या वरील व्यक्तींना ट्रेकिंग करता येणार नाही. ताप सर्दी खोकला असल्यास ट्रेकिंगला जाता येणार नाही स्थानिकांच्या घरात भोजन करता येणार नाही व मुक्काम करता येणार नाही. ट्रेकिंगच्या कालावधीत एकमेकाचा वस्तू वापरता येणार नाहीत. अशा विविध अटी व शर्ती लागू करून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रेकर्ससाठी ट्रॅकिंग करण्यासाठी सर्व गड-किल्ले खुली केली आहेत.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियाचे गेमचेंजर 5 शिलेदार, दक्षिण आफ्रिकेकडून चषक आणतील खेचून
टीम इंडियाचे गेमचेंजर 5 शिलेदार, दक्षिण आफ्रिकेकडून चषक आणतील खेचून
मोठी बातमी : माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी, तब्बल एक कोटीची मागितली खंडणी
मोठी बातमी : माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी, तब्बल एक कोटीची मागितली खंडणी
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये, अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल? A to Z माहिती
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

IND VS SA : टी 20 विश्वचषकात आज भारत-दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना ABP MajhaAjit Pawar Vs Sharad Pawar : अजितदादांचे आमदार परतीच्या वाटेवर? Special ReportMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियाचे गेमचेंजर 5 शिलेदार, दक्षिण आफ्रिकेकडून चषक आणतील खेचून
टीम इंडियाचे गेमचेंजर 5 शिलेदार, दक्षिण आफ्रिकेकडून चषक आणतील खेचून
मोठी बातमी : माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी, तब्बल एक कोटीची मागितली खंडणी
मोठी बातमी : माजी आमदाराला अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी, तब्बल एक कोटीची मागितली खंडणी
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची 'लाडकी बहीण योजना'; महिलांना दरमाहा मिळणार दीड हजार रुपये, अर्ज कसा कराल?
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल? A to Z माहिती
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
...तोपर्यंतच माझ्या हातात धनुष्यबाण, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले मला पण पालकमंत्री व्हायचंय
Nana Patole : 'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ'; मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
'डोन्ट अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन'; लंके समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून विखे पाटलांना डिवचलं!
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
फडणवीस आणि मुनगंटीवार आपले वाढदिवस तिथीनं साजरे करतात का ? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
लडाखमध्ये रणगाडा सरावादरम्यान मोठी दुर्घटना! नदी ओलांडताना अचानक वाढली पाण्याची पातळी, पाच जवान शहीद
Embed widget