LIVE UPDATES | शिवसेनेचे नाराज खासदार संजय जाधव मुख्यमंत्र्यांना भेटणार
MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य शासनाचा निर्णय विनायक मेटे यांच्यामुळे मराठा आरक्षणावर बालंट ओढवलं असतं: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप घरच्यांनी दबाव आणला म्हणून बलात्काराची तक्रार दाखल केली, हा दावा मान्य होऊ शकत नाही : हायकोर्ट रत्नागिरीत काम करण्यास डॉक्टर वैद्यकीय अधिकारी इच्छुकच नाहीत, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती पुण्यातील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाची घाई, काम अपूर्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे अनेक विद्यार्थींना परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीनंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील हा विषय लावून धरला होता.
कोरोनामुळे निर्माण झालेला धोका, मर्यादित दळणवळण, विद्यार्थ्यांचे या काळात अभ्यासात झालेले नुकसान या सर्वांचा विचार करून एमपीएससी मार्फत येत्या 20 सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.
राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असताना रत्नागिरीत काम करण्यास वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर इच्छुकच नाहीत अशी कबूली राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी रिक्त पदं भरण्यास शासन प्रयत्नशील आहे. परंतु उमेदवार याकडे पाठ फिरवत असल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
पुण्यातील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाची घाई, काम अपूर्ण असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : पुण्यातील बहुचर्चित जम्बो कोविड केअर सेंटरचं उद्घाटन रविवारी (23 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु या कोविड केअर सेंटरचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काम पुर्ण न झालेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्याची घाई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी का केली असा प्रश्न विचारला जातोय.