Corona Update | राज्यात आज 2553 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आज 1661 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2553 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 88,528 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 109 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा आकडा 50 हजारावर गेला आहे.
मुंबई : राज्यात आज 1661 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 40,975 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 2553 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 88 हजार 528 इतका झाला आहे. त्यापैकी सध्या 44 हजार 374 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील बाधित रुग्णांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 71 पुरुष तर 38 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 109 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 59 रुग्ण आहेत तर 44 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 6 जण 40 वर्षांखालील आहे. या 91 रुग्णांपैकी 79 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आज झालेल्या मृत्यूपैकी 32 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 3 मे ते 5 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 77 मृत्यूपैकी मुंबई 51, औरंगाबाद 8, रत्नागिरी 3, धुळे 4, अहमदनगर, भिवंडी, जळगाव, जालना, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई विरार येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 88,528
मृत्यू - 3169
मुंबई महानगरपालिका- 50,085 (मृत्यू 1702)
ठाणे- 1241 (मृत्यू 22)
ठाणे महानगरपालिका- 5016 (मृत्यू 120)
नवी मुंबई मनपा- 3590 (मृत्यू 86)
कल्याण डोंबिवली- 1887 (मृत्यू36)
उल्हासनगर मनपा - 553 (मृत्यू 21)
भिवंडी, निजामपूर - 294 (मृत्यू 12)
मिरा-भाईंदर- 946 (मृत्यू 39)
पालघर- 214 (मृत्यू 6 )
वसई- विरार- 1353 (मृत्यू 35)
रायगड- 754 (मृत्यू 29)
पनवेल- 707 (मृत्यू 26)
नाशिक - 250 (मृत्यू 4)
नाशिक मनपा- 504 (मृत्यू 19)
मालेगाव मनपा - 838 (मृत्यू 68)
अहमदनगर- 156(मृत्यू 8)
अहमदनगर मनपा - 52(मृत्यू 1)
धुळे - 91 (मृत्यू 13)
धुळे मनपा - 170 (मृत्यू 12)
जळगाव- 818(मृत्यू 100)
जळगाव मनपा- 263 (मृत्यू15)
नंदुरबार - 40 (मृत्यू 4)
पुणे- 664 (मृत्यू 16)
पुणे मनपा- 8537 (मृत्यू 381)
पिंपरी-चिंचवड मनपा- 676 (मृत्यू 16)
सातारा- 640 (मृत्यू 27)
सोलापूर- 98 (मृत्यू 6)
सोलापूर मनपा- 1321 (मृत्यू 104)
कोल्हापूर- 623 (मृत्यू 8)
कोल्हापूर मनपा- 25
सांगली- 157(मृत्यू 3)
सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 13 (मृत्यू 1)
सिंधुदुर्ग- 113
रत्नागिरी- 371 (मृत्यू 13)
औरंगाबाद - 52 (मृत्यू 2)
औरंगाबाद मनपा - 1984 (मृत्यू 98)
जालना- 208 (मृत्यू 5)
हिंगोली- 214
परभणी- 53(मृत्यू 3)
परभणी मनपा-25
लातूर -107 (मृत्यू 4)
लातूर मनपा- 31
उस्मानाबाद-125(मृत्यू 3)
बीड - 56(मृत्यू 1)
नांदेड - 33(मृत्यू 1)
नांदेड मनपा - 137 (मृत्यू 7)
अकोला - 52 (मृत्यू 6)
अकोला मनपा- 782 (मृत्यू 30)
अमरावती- 21 (मृत्यू 2)
अमरावती मनपा- 278 (मृत्यू 16)
यवतमाळ- 163(मृत्यू 2)
बुलढाणा - 95 (मृत्यू 3)
वाशिम - 10(मृत्यू 2)
नागपूर- 50
नागपूर मनपा - 711 (मृत्यू 11)
वर्धा - 11 (मृत्यू 1)
भंडारा - 41
चंद्रपूर -27
चंद्रपूर मनपा - 15
गोंदिया - 68
गडचिरोली- 44
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 64 हजार 331 नमुन्यांपैकी 88,528 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 64 हजार 726 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 760 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.