एक्स्प्लोर

Corona World Update | जगभरात कोरोनामुळं 2 लाख 83 हजार मृत्यू, जवळपास 15 लाख रुग्ण झाले बरे

जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 42 लाखांच्या वर गेला आहे.

मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. मागील 24 तासात 79,875 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर 24 तासात 3,510 लोकांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे.  वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 83 हजार 734  वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 42 लाखांजवळ गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 14 लाख 90 हजार 444  रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 30 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत. Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO जगात  कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,367,638 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 80,787 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 31,855 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 219,183 इतकी आहे.  स्पेनमध्ये कोविड-19मुळं  26,621 लोकांचा मृत्यू झालाय. 264,663 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,560 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 219,070 इतका आहे. कोरोना संसर्ग सर्वाधिक असलेले दहा देश
  • अमेरिका: कोरोनाबाधित- 1,367,638,    मृत्यू- 80,787
  • स्पेन: कोरोनाबाधित- 264,663,              मृत्यू- 26,621
  • यूके: कोरोनाबाधित- 219,183,                मृत्यू- 31,855
  • इटली: कोरोनाबाधित- 219,070,            मृत्यू- 30,560
  • रशिया: कोरोनाबाधित- 209,688,              मृत्यू- 1,915
  • फ्रांस: कोरोनाबाधित- 176,970,              मृत्यू- 26,380
  • जर्मनी: कोरोनाबाधित- 171,879,            मृत्यू- 7,569
  • ब्राझिल: कोरोनाबाधित- 162,699,          मृत्यू- 11,123
  • टर्की: कोरोनाबाधित- 138,657,              मृत्यू- 3,786
  • इरान: कोरोनाबाधित- 107,603,            मृत्यू- 6,640
  • चीन: कोरोनाबाधित- 82,901,                मृत्यू- 4,633
10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 80 हजारांवर गेला आहे.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर भारतात आत्ता कोविडचे 67 हजार 161 रुग्ण तर 2212 बळी कोरोनामुळं गेले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Pune Accident : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
Suresh Dhas : खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Teacher Death News : फेसबूक पोस्ट करुन शिक्षकाने जीवन संपवलं, १८ वर्ष काम करुनही पगार न दिल्यानं उचललं टोकाचं पाऊलMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 16 March  2025 : 4 PM : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 16 March 2025Vishal Patil On Chandrakant Patil : चंद्रकात पाटलांची खुली ऑफर खासदार विशाल पाटील स्वीकारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Pune Accident : पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
पुण्यात एकाच रात्रीत तीन अपघात, 2 जणांचा मृत्यू तर  3 जण जखमी
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
धक्कादायक! नराधम तरुणाकडून रस्त्यावरील कुत्र्यावर अत्याचार, 'त्या' कारणासाठी कुत्र्याच्या गुप्तांगावर कट मारले
Suresh Dhas : खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
Embed widget