(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Virus | चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातले!
कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 169 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हा व्हायरस वेगाने जगभर पसरत असल्याचं दिसत आहे.
गडचिरोली : कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये 169 जण दगावले आहेत. या विषाणूच्या विळख्यात आता चीनमध्ये शिकणाऱ्या 27 भारतीयांना बसला आहे. त्यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. ही मुलं चीनच्या हुआन शहरापासून 90 किलोमीटर अंतरावरील सीयानीगमधील हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत. सात महाराष्ट्रीयन मुलांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सीयानीगमध्ये काही जणांना हा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे हुबे विद्यापीठाने 27 भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यास मनाई केली आहे. त्यांच्याकडे असलेले जेवणाचे साहित्य संपायला आलं आहे. दरम्यान सातही जणांनी कुटुंबीयांशी आणि भारतीय दुतावासाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली आहे. इंग्लंड, अमेरिका अगदी पाकिस्तानही आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना परत आणण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.
सात अडकलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी 1 सलोमी त्रिभुवन - पुणे 2 जयदीप देवकाटे - पिंपरी चिचवड 3 आशिष गुरमे - लातूर 4 प्राची भालेराव - यवतमाळ 5 भाग्यश्री उके - चंद्रपूर 6 सोनाली भोयर - गडचिरोली 7 कोमल जल्देवार - नांदेड
कोरोना व्हायरस म्हणजे काय? प्राण्यांपासून या विषाणूचा मनुष्याला संसर्ग होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसची लक्षणे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
चीनमधून कसा पसरला व्हायरस? चीनमधील 7711 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे तर इतर देशातील 70 लोकांना संसर्ग आहे. 1370 रुग्ण गंभीर आहेत तर 12, 167 संशयित रुग्ण आहेत. तब्बल 81 हजार 947 डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. चीनमधून 17 देशात घातक विषाणू पसरला. 2002-200३ साली चीनमध्ये आलेल्या सार्स रोगापेक्षा कोरोना व्हायरस जास्त पसरला. सार्समुळे 700 बळी गेले होते. कोरोना व्हायरसची सुरुवात ज्या वुहान प्रांतात झाली. भारतातून तब्बल 23 हजार विद्यार्थी चीनमध्ये शिकायला असतात, त्यातील 21 हजार वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत. त्यापासून फक्त 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले असून त्यापैकी 7 विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.आतापर्यंत कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळलेले देश - - चीन - संयुक्त राष्ट्र - फ्रान्स - जपान - दक्षिण कोरिया - तैवान - सिंगापूर - थायलंड - ऑस्ट्रेलिया - नेपाळ - व्हिएतनाम - हाँगकाँग - मकाऊ - मलेशिया - कॅनडा - कंबोडिया
संबंधित बातम्या
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे 25 बळी, मुंबई-पुण्यात 5 संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
अल्पावधीतच डझनहून अधिक देशांत 'कोरोना व्हायरस'ची लागण; मृतांची संख्या 100 वर
EXPLAINER VIDEO | कोरोना व्हायरस नेमका कसा पसरला? तुम्ही काळजी कशी घ्याल? बातमीच्या पलीकडे