Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, आज 12,822 रुग्णांची नोंद
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा पाच लाखांचा टप्पा पार झाला आहे. राज्यात एकूण 1 लाख 47 हजार 48 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 275 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. आज राज्यात एका दिवसात 12 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज राज्यात 12 हजार 822 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 11 हजार 81 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांचा पाच लाखांचा टप्पा पार
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा पाच लाखांचा टप्पा पार झाला आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 5 लाख 3 हजार 84 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 38 हजार 362 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 1 लाख 47 हजार 48 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 275 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 26 लाख 47 हजार 20 नमुन्यांपैकी 5 लाख 3 हजार 84 म्हणजे 19 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 89 हजार 612 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 35 हजार 625 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 11 हजार 81 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 67.26 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 275 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.
TOP 100 News | देशभरातील शंभर महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
