(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माजी आमदाराच्या घरवापसीवरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; गोंदियात शिवसेना काँग्रेसमध्ये रंगला कलगितुरा!
Maharashtra Politics: गोंदिया विधानसभेचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशापूर्वी महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पेटल्याचे बघायला मिळत आहे.
Maharashtra Politics गोंदिया : गोंदिया विधानसभेचे (Gondia Assembly) माजी आमदार गोपाल अग्रवाल (Gopaldas Agarwal) यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी काल दिली होती. दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कमजोर असल्याचे म्हटले होते. तर पुढे ही जागा आमच्याच वाट्याला येईल असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला असून पक्ष प्रवेशापूर्वीच जर अशा पद्धतीने अग्रवाल हे वक्तव्य करत असतील, तर ते योग्य नाही.
गोंदिया विधानसभेत आमचे संघटन मजबूत असून आम्ही ही जागा सोडणार नाही, अशी भूमिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली आहे. तर माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशापूर्वी महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पेटल्याचे बघायला मिळत आहे.
गोंदियाच्या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये कलगितुरा!
पूर्व विदर्भातील गोंदियामधून काँग्रेसच्या तिकिटावर 3 वेळा विधानसभा आणि 2 वेळा विधानपरिषद सदस्य राहिलेले, तसेच सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला रामराम केला आहे. तर येत्या 13 सप्टेंबरला काँग्रेसमधे घरवापसी करनार असल्याची माहिती स्वत: गोपाल अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदे घेत त्यांनी ही माहिती दिली आहे. अग्रवाल (Gopaldas Agarwal) यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र माजी आ. गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केलं. मात्र त्यांच्या घरवापसीवरुन महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली असून गोंदिया विधानसभेच्या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये रस्सीखेंच होत असल्याचे दिसून आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, नाहीतर विधानसभेवरही प्रशासक नेमा
स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहे, तर विधानसभेवरही प्रशासक नेमा. अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी वर्ध्यात केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक सध्या काम करीत आहेत. संविधानातील 73 व 74 घटनादुरुस्तीनुसार पाच वर्षांच्या कार्यकाळ संपल्यावर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे आवश्यक आहे. मात्र नगर परिषद, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमून सामान्य माणसाच्या अधिकारांना तिलांजली दिली जात आहे. तर मग विधानसभा आणि लोकसभा यावर देखील प्रशासक नेमला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडण्यामागे शासनाचे षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात आलाय. ग्राम पंचायतवर प्रशासक नेमत आहात, तर मग विधनसभेवरही प्रशासक नेमा. अशी मागणी करून महाविकास आघाडीच्या घटकपक्षातील नेत्यानी पत्रकार परिषद घेत लक्ष वेधले आहे.
हे ही वाचा