ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता, मंत्री छगन भुजबळ यांचे सूतोवाच
Chhagan Bhujbal : ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
Maharashtra Politics नाशिक : ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. नाशिकच्या येवला (Yeola) दौऱ्यावर आले असता ते येवल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे त्यांनी यावेळी दिली. जागा वाटपाबाबतीतही मत व्यक्त करतांना भुजबळ म्हणाले की, महायुतीतील घटक पक्षांना समान न्याय मिळेल, असा संदेश दिल्लीच्या नेत्यांनी दिला आहे.
महायुती सरकार विधानसभेच्या अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मंजूर केले आहे. त्याचा लाभ मराठा बांधवांना होतोय, असेही भुजबळ म्हणाले. अजित पवार आमचे कॅप्टन आहे. त्यांनी शस्त्र खाली ठेवणे योग्य होणार नाही. ते बारामतीतूनच लढतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त करीत अजित पवार बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
अजित पावर बारामतीमधूनच लढतील अन् विजयी होतील- छगन भुजबळ
लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची (State Assembly Election 2024) घोषणा होणार आहे. हीच शक्यता लक्षात घेता राज्यभरातील पक्षांनी आतापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. सभा, बैठका, रॅली यामार्फत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न राज्यातील सर्वच पक्ष करत आहेत. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली जात आहे. भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष केंद्रातील नेत्यांनाही महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलवणार आहेत. असे असतानाच आता काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोठी योजना केली आहे. पक्षातर्फे काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.
तर दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. मुंबई दौऱ्याचा समारोप होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते. महाराष्ट्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागावाटपात सन्मानजनक जागा देण्याचा शब्द दिला आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असे असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी सूतोवाच करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महायुतीच्या बैठकीत काय घडलं?
अमित शाह यांनी महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री दिली. महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना अमित शाह यांनी जागा वाटपाबाबत शब्द दिला आहे. याशिवाय ज्या जागा निवडून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या सूचना देखील अमित शाह यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा