एक्स्प्लोर
Advertisement
लातुरात पैसे वाटल्यामुळे भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण?
लातूर : लातूरमध्ये भाजप उमेदवाराच्या पतीला झालेल्या मारहाण प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करतानाचं फुटेज व्हायरल झालं आहे. त्यामुळे पैसे वाटपावरुन तर वाद झाला नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लातूरमध्ये राजकीय हाणामारीची घटना घडली. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार असलेल्या शीतल मालू यांचे पती शिवकुमार मालू यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली.
शीतल मालू या लातूर महापालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवार आहेत.
धक्कादायक म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवकुमार मालू यांच्यावर उकळता चहा फेकला आणि त्यानंतर जबर मारहाण केली.
"निवडणुकीत प्रचार करु नको. व्यवसायात लक्ष घाल", असे धमकावत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
शिवकुमार मालू यांना लातूरमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
लातूर महापालिका निवडणूक
दहा महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर लातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. या तीन महापालिकांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर 21 एप्रिलला मतमोजणी होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
परभणी
भारत
विश्व
Advertisement