Nana Patole : राज्यात 40 च्यापुढे तर देशात 300 जागा जिंकू; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा विश्वास
पंतप्रधान मोदींचा करिश्मा आता उतरलेला आहे. त्यामुळे आम्ही यंदा महाराष्ट्रात 40 च्या पुढे, तर देशात 300 च्या वर जागा जिंकू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे
Nana Patole on ABP Cvoter Exit Poll : जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. तर पंतप्रधान मोदींचा करिश्मा आता पुरता उतरलेला आहे. त्यामुळे आम्ही यंदा महाराष्ट्रात 40 च्या पुढे आम्ही जाऊ, तर देशात 300 च्या वर जागा जिंकू. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांची यात्रेचा निमित्ताने लोकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. इंडिया आघाडीला पूर्ण देशात समर्थन मिळाले आहे. त्यामुळे आज मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलमध्ये (ABP Cvoter Exit Poll) देखील त्याचा परिणाम दिसून येईल, असेही नाना पटोले म्हणाले.
आज जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठांनी घेतला आहे. याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशात सध्या परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे हाय कमांड योग्य निर्णय घेतील. पक्षातील वरिष्ठांचा आदेश असेल तर एक्झिट पोलला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारला शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाही का?- नाना पटोले
आज महाराष्ट्रात 75 टक्के भागात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र सरकारला शेतकऱ्यांचे अश्रू का दिसत नाही? केवळ दिशाभूल करणारे वक्तव्य केले जात आहेत. पाणी टंचाई शहरी आणि ग्रामीण भागातही आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. सरकारने या विषयात लक्ष घातले पाहिजे. सध्या नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर अजित पवार आणि शिंदे गट राहील की नाही, हा मोठा प्रश्न आहे. तर अनेकजण काँग्रेसकडे येतील, असा दावाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे.
सत्तेतील लोक भांबावली आहेत
सत्तेतील लोक भांबावली आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघाडत चालला असून त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा. नागपुरातही गर्भश्रीमंत लोकांनी बेदरकारपणे कार चालवून एका महिलेले धडक दिली आहे. जळगावातही असेच झाले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दखल या सरकारने घ्यावी. मात्र यावर कुणीही बोलायला तयार नाही. सरकारमधील लोक याला नौटंकी म्हणतात. मात्र हा टिंगल किंवा राजकारणाचा विषय नाही. यात दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सहभाग आहे, आम्ही याबाबत मुख्यमंत्री यांना विचारले असता, ते आज एक बोलतात तर उद्या दुसरे बोलतात. असेही नाना पटोले म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणजे सरकार नाही
उद्धव ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यावरून होत असलेल्या टीकेवर नाना पटोले यांनी उत्तर देत सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणजे सरकार नाही. हे काम आता सरकारचे आहे. त्यामुळे त्यांनी कुठे राहावे, हा त्यांचा प्रश्न आहे. ते मुख्यमंत्री असते तर आम्हीही विरोध केला असता. मात्र 2012 मध्ये सरकारने दुष्काळी परिस्थितीत मदत केली होती. पण अलिकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. राज्यात बियाणांचा वाद सुरू झाला आहे. यात सरकारच्याच मंत्र्यांचा सहभाग आहे, अशा तक्रारी आल्या आहेत.
भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाला आमचा विरोध
अकोल्यात शेतकऱ्यांना उन्हात उभे राहावं लागत आहे. मात्र शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडण्याचे काम केले असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. या सरकारने पाम तेलाच्या धर्तीवर पनीर आयात करण्याची परवानगी दिली. त्यामुळे दुधाचे भाव घसरायला लागले आहेत. लोकांना पोषक आहार मिळत नाही. हे सरकार जनता आणि शेतकर्यांचे नुकसान करतेय. शेतकरी विरोधी धोरणाला आमचा विरोध असून पाम तेलावर बंदी आणण्याची आम्ही मागणी केली असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या