एक्स्प्लोर
Advertisement
शाह - तानाशाहांचं सरकार नरभक्षी, काँग्रेसचा हल्लाबोल
शाह - तानाशाहांचं सरकार नरभक्षी, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी मोदी सरकारवर केला.
यवतमाळ: कीटकनाशक फवारणीमुळे 36 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानं काँग्रेसनं आज यवतमाळमध्ये महामोर्चा काढला.
शाह - तानाशाहांचं सरकार नरभक्षी आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी मोदी सरकारवर केला.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात आर्णी रस्त्यावरच्या काँग्रेस कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तिथेच सभा होऊन मोर्चाचा समारोप भाषणं झाली.
फवारणी करताना विषबाधा होऊन 36 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही मुख्यमंत्री यवतमाळला का फिरकले नाहीत? असा सवाल करुन अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर टीकास्त्र डागलं.
कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांचे मृत्यू होत असताना, सरकार या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करत आहे. झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान या मोर्चात काँग्रेसचे सरचिटणीस मोहनप्रकाश यांच्यासह काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आणि जिल्ह्यातील अनेक माजी आमदार उपस्थित आहेत.
चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा?
कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात 36 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकरी विषबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचं समोर आलं आहे.
प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे.
पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे.
फवारणी करताना काय काळजी घ्याल?
फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो.
शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत..
ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या :
कीटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?
चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा?
फवारणी करताना विषबाधा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत!
‘फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर
अकोल्यात 14 कोटींचा अवैध कीटकनाशक साठा जप्त
मनसेचा आक्रमक पवित्रा, शेतकरी मृत्यूप्रकरणी यवतमाळमध्ये तोडफोड
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement