Nana Patole : महाराष्ट्रात एक कोटी तरुणांना रोजगार देणार ; नाना पटोलेंची माहिती
Gondia News Update : महाराष्ट्रात दोन ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी तयार करत एक कोटी तरुणांना रोजगार देणार असा काँग्रेसचा संकल्प करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.
Nana Patole : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे. याच वाढदिवाचे औचित्य साधून नाना पटोले यांनी एक मोठी घोषणा केली आहे. दोन ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी तयार करून महाराष्ट्रीतील तरूणांना एक कोटी तरूणांना रोजगार देण्याचा काँग्रेसने संकल्प केला असून हा संकल्प पूर्णत्वास नेहण्यासाठी मी प्रयत्न करण्याचा संकल्प आपल्या वाढदिवसानिमित्त करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
"आमचं ठरलंय, महाराष्ट्रात दोन ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी तयार करत एक कोटी तरुणांना रोजगार देणार असा काँग्रेसचा संकल्प असून काँग्रेसचा हा संकल्प पूर्ण करून राज्यातील एक कोटी तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प करत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे काँग्रेसने नवसंकल्प अधिवेशन घेतले आहे. या नवसंकल्प अधिवेशनाच्या माध्यमातून जी भूमिका घेतली ती जनतेपर्यंत पोहचवणे आणि महाविकास आघाडी सरकारकडून करवून घेण्यार असल्याचे ठरेलं आहे."
"शेतकरी हा देणारा असतो. परंतु, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मागणाऱ्याच्या भूमिकेत नेहून ठेवले आहे. आता आम्ही महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी दोन ट्रिलियन डॉलरची इकोनॉमी तयार करत आहोत. या इकोनॉमीच्या माध्यमातून एक कोटी तरुणांना रोजगार देणार आहोत. शिवाय इकोनॉमीमुळे शेतकऱ्यांना ताठ मानने जगता येणार आहे. याच बरोबर केंद्रातील सरकारने जाती-धर्मात द्वेष निर्माण केला आहे. परंतु, केंद्राचा हा डाव आम्ही चालू देणार नाही, असा संकल्प करण्यात आल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. "केंद्रातील भाजप सरकार जाती-धर्मात द्वेष निर्माण करत आहे. लोकांची दिशाभूल करण्याचं काम भाजप सरकाकडून करण्यात येत आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून येथील शेतरी हा नेहमीच देणाऱ्याच्या भूमिकेत असतो. परंतु, केंद्रातील भाजप सरकारने याच शेतकऱ्याला मागणाऱ्याच्या भूमिकेत ढकलले आहे. परंतु, आम्ही तयार करत असलेल्या इकोनॉमीमुळे आगामी काळात शेतकऱ्यांना ताठ मानने जगता येणार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.