Nana Patole : 'उंदराबद्दल मी काही वक्तव्य करत नाही', नाना पटोलेंची प्रफुल्ल पटेलांवर खोचक टीका
Nana Patole ज्या पक्षाने या लोकांना मोठं केलं त्यांनीच आपल्या आईला अशा पद्धतीने बोलावं, अशा उंदरांबद्दल मी फार काही बोलत नाही. या शब्दात नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेलांवर टीका करत प्रत्युत्तर दिले.
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस (Congress) पक्ष आज सर्वत्र विस्कळीत होत चालला आहे. महाराष्ट्रासह देशामध्ये काँग्रेसची आज काय हालत झाली आहे, ते या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. असे वक्तव्य करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत प्रफुल्ल पटेल यांच्यावर हल्ला चढविला आहे. ज्या काँग्रेस पक्षाने या लोकांना मोठं केलं त्यांनी आपल्याच आईला अशा पद्धतीने बोलावं, हे त्यांच्या स्वभावाला कसं पटतं हे मला माहिती नाही. त्यामुळे अशा उंदरांबद्दल मी फार काही बोलत नसल्याचे म्हणत नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या त्या वक्तव्यावर भाष्य केलंय.
बोलताना जरा सांभाळून बोलावं
रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने उमेदवार असलेल्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिल्यानंतर आयोजित सभेत काँग्रेस नेते सुनील केदार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर भाष्य करताना नाना पटोले यांनी सुनील केदार यांनीही जरा सांभाळून बोलावं अशी विनंती केली आहे. त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे. पंजा चिन्हावर आपण लढणार आहोत. त्यामुळे बोलतांना जपून बोलण्याचा सल्लाही नाना पटोले यांनी सुनील केदारांना दिला आहे.
दरम्यान, आज रामटेकच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. यावर नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही या जागेसाठी दुसरा उमेदवार तयार ठेवलेला आहे. मात्र ही कारवाई राजकीय द्वेषापोटी झालेली आहे. भाजप हा घाबरलेला पक्ष आहे. त्यामुळे ते खालच्या स्तराला जाऊन असे राजकारण करायला निघालेले आहेत. सध्या भाजपला सत्तेतून बाहेर जाण्याची भीती निर्माण झाली असल्याचेही नाना पटोले म्हणाले.
नाना पटोलेंचे प्रफुल्ल पटेलांना प्रत्युत्तर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल भंडारा येथील सभेत काँग्रेसमध्ये असलेले माझीच पैदास आहे असे वक्तव्य केले होते. यावर नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना प्रत्युत्तर देत ती काँग्रेसची वाईट पैदास होती आणि ती निघून गेली आहे. त्याचा आम्हाला आनंद असल्याचे म्हणत नाना पटोलेंनी प्रफुल्ल पटेल यांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या