एक्स्प्लोर

Balasaheb Thorat : भाजप घाबरलेल्या स्थितीत, जागावाटपावरून महायुतीत पुन्हा भूकंप होणार; बाळासाहेब थोरातांचा मोठा दावा

Balasaheb Thorat : बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार असून लोक पुन्हा काँग्रेसकडे, आघाडीमध्ये येत आहेत. जनतेची भावना आघाडीच्या बाजूने असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी बोलताना स्पष्ट केला. 

नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा केवळ महाराष्ट्राच्या फायद्यासाठी नसून देशाच्या फायद्यासाठी असल्याचे मत, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मणिपूरपासून सुरू झालेली यात्रा नाशकामध्ये प्रचंड जल्लोषात पोहचली, सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला, ठिकठिकाणी राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशकामध्ये पोहोचली आहे. नाशिकमध्ये आज त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले, आज त्यांची यात्रा नाशकामध्ये मुक्काम करणार आहे. 

16 मार्च रोजी यात्रेचा समारोप होणार 

दरम्यान, 17 मार्च रोजी इंडिया आघाडीची भव्य सभा होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तत्पूर्वी, 16 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी चैत्यभूमी येथे भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. 

बाळासाहेब थोरात यांनी जागावाटपावरती भाष्य केले. ते म्हणाले की, दोन चार गोष्टींवरती चर्चा होणं बाकी असून आम्हाला त्याची माहिती आहे, कोणाच्या कोट्यात कोणत्या जागा आहेत हे माहीत असल्याने  आम्ही कामाला लागलो आहोत. फक्त यादी जाहीर होणं बाकी आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नाराजीवरही  भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की आता नाराजीचा प्रश्न येत नाही. अशी वेळ आली की देश आपल्याला पुढे कोणत्या पद्धतीने न्यायचा आहे, पुढे लोकशाही राहणार की नाही, राज्यघटना राहणार की नाही असे प्रश्न उपस्थित होत असताना आता सर्वांनी एकत्र यायला हवं आणि हीच भावना त्यांच्या मनामध्ये आहे.

भारतीय जनता पक्ष घाबरलेल्या अवस्थेत

थोरात यांनी भाजपच्या दुसऱ्या उमेदवारी यादीवर भाष्य केले ते म्हणाले की असे वाटले की काहीतरी नवीन होईल. मात्र, नवीन करण्याचं काही धाडस नाही. भारतीय जनता पक्ष घाबरलेल्या अवस्थेत आहे ही वस्तुस्थिती आहे, असा दावा त्यांनी केला. जागा वाटपावरून महायुतीमध्ये भूकंप होणार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार असून लोक पुन्हा काँग्रेसकडे, आघाडीमध्ये येत आहेत. जनतेची भावना आघाडीच्या बाजूने असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी बोलताना स्पष्ट केला. 

तर निश्चितच विजयी होतील

दरम्यान आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी जर ते अहमदनगर दक्षिणमधून लढल्यास तर निश्चितच विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली आहे, काम करणारे तरुण असे त्यांचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. ते  मतांनी विजयी होतील असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Zomato Share Price  :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?
झोमॅटोच्या शेअरमध्ये घसरणीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; मनपाच्या निवडणुकीआधी शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
Embed widget