एक्स्प्लोर
20 मिनिटं उरलीत, जाऊ नका, काँग्रेसच्या मोर्चाचा बोजवारा

यवतमाळ : भाजपच्या 'चाय पे चर्चा' या कार्यक्रमाच्या विरोधात आज काँग्रेसनं यवतमाळमध्ये चाय पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कोरा चहा पिऊन काँग्रेसने आपला निषेध व्यक्त केला. मात्र काँग्रेसच्या या निषेध मोर्चाचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र होतं.
दिल्लीतले अनेक दिग्गज नेते या आंदोलनाला उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाला लोक थांबावेत, यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर विनवण्या करण्याची वेळ आली. श्रोते सभास्थळातून काढता पाय घेत असताना केवळ 20 मिनिटांचा कार्यक्रम शिल्लक आहे, लोकांनी जाऊ नये अशा सूचना द्यावा लागल्या. मात्र तरीही लोकांवर त्याचा परिणाम झाला नाही.
महत्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना अशोक चव्हाणांसह दिग्विजय सिंह, राज बब्बर अशी दिल्लीतली मंडळीही मंचावर उपस्थित होती.
यवतमाळमधल्या बाभळी गावात हा कार्यक्रम घेतला गेला. निवडणूक काळात याच गावात भाजपनं चाय पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचा निषेध म्हणून काँग्रेसनं कोरा चहा पिऊन याठिकाणी सभेचं आयोजन केलं होतं.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
















