एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट !
मुंबई : कोपर्डी बलात्कारप्रकरणी विरोधीपक्षांनी मुख्यमंत्री आणि सरकारला घेरल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्याच त्वेषाने विरोधकांचं जाळं भेदलं. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांचं अक्षरश: वस्त्रहरण केलं.
मी एकटा मुख्यमंत्री
नारायण राणे म्हणतात राज्यात एक नव्हे तर तीन मुख्यमंत्री. पण मी राणेसाहेबांना सांगू इच्छितो, तीन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला असेल. मी एकटाच मुख्यमंत्री आहे, आणि सक्षम आहे, असं रोखठोक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
कालच चर्चेदरम्यान राणेंनी राज्यात तीन मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. एक देवेंद्र फडणवीस, दुसरे प्रवीण परदेश आणि तिसरा वेळ आल्यावर सांगू असं म्हटलं होतं. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंवरही टीकास्त्र सोडलं. विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीने आरोप करणे आवश्यक होतं. कायद्याचं ज्ञान मलाही आहे. कॅबिनेट मंत्री राम शिंदेंसोबत आरोपीचा फोटो असल्याचा कांगावा विरोधी पक्षनेत्यांनी केला. मात्र त्यापूर्वी त्यांनी थोडीशी खातरजमा करणं आवश्यक होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राम शिंदेंना वाचवण्यासाठी आरोपीचा फोटो दाखवला होता, असा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता.
नारायण राणेंचं वस्त्रहरण
कोपर्डी बलात्कार प्रकरणावरुन नारायण राणे यांनी कालच विधानपरिषदे मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली होती. त्याला आज मुख्यमंत्र्यांना त्याच त्वेषाने उत्तर दिलं.
मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे
कोपर्डी बलात्कार: मला कोणाला दम द्यायचा नाही, माझा तो स्वभाव नाही, मी शांत स्वभावाचा- मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार: एखाद्या महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाला असेल, तर राणेंनी तो समोर आणावा- मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार: उत्पादन खात्यातील बदल्या सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसारच - मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार: आमचा मंत्री एखाद्या प्रकऱणात सापडला, तर एक मिनिटही त्याला मंत्रिमंडळात ठेवणार नाही
कोपर्डी बलात्कार: आम्ही आकसाने कोणावरही कारवाई करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा राणेंवर निशाणा
कोपर्डी बलात्कार: राणे रागाने बोलतात तेव्हा त्यांना गांभिर्याने घेत नाही- मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार: राणेसाहेब तुम्ही विलासराव, अशोक चव्हाण, माणिकराव, पृथ्वीराज चव्हाणांबद्दल काय काय बोललात मला माहिताय- मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार: आम्ही कुणाच्या चौकशा लावल्या? राणेसाहेब तुम्ही सज्जन असाल तर का घाबरता?-मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार: जो काच के घरों में रहते है, ओ दुसरों के घरोंपर पत्थर नहीं फेकते है - मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार: सिंधुदुर्गात कुणावर किती गुन्हे हे सांगितलं तर राणेंची पंचाईत होईल - मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : भाजप हा गुंडांचा पक्ष हे कोण म्हणतंय, मुख्यमंत्र्यांचा राणेंवर घणाघात
कोपर्डी बलात्कार: राणेंइतका मला अनुभव नाही, माझं मूल्यमापन जनता करेल: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : राणे म्हणाले 3 मुख्यमंत्री, पण मी एकच मुख्यमंत्री आणि मी सक्षम आहे : मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : विरोधी पक्षनेत्याने जबाबदारीने आरोप करायला हवे होते: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : आपण जे पुरावे गोळा केलेत, ते पाहता आरोपींना फाशीच होईल: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : अवघ्या दीन महिन्यात निकाल देण्याची घटना देशात केवळ महाराष्ट्रातच घडली: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : 27 विशेष आणि 22 फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : प्रतिसाद अॅपमुळे गुन्हे रोखण्यास मदत होईल: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : महिलांमधील अत्याचार वाढले नाहीत, विरोधकांचे आरोप चुकीचे: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : या खटल्यात पॉस्कोअंतर्गतही गुन्ह्याची नोंद, कडक शिक्षेसाठीच प्रयत्न: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : याप्रकरणाचा निकाल तातडीने कसा लावता येईल, याची चाचपणी केली: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : पुराव्यांची जुळवाजुळव केली आहे, उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून काम पाहतील: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : चौथा आरोपी विजय शिंदेची चौकशी सुरु : मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : आरोपी जितेंद्र शिंदेला 9 तासात अटक केली, तपासात हलगर्जी नाही: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement