एक्स्प्लोर

Mumbai News: नायर रुग्णालय प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, डीनच्या बदलीसह विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

Nair Hospital Case: मुंबईतील नायर रुग्णालय प्रकरणामुळे राज्याचे राजकारणही तापले असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Nair Hospital मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित आणि मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय (Nair Hospital) व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक छळ (Sexual Harassment Case) केल्याचा प्रकार घडला होता. रुग्णालयात कार्यरत असलेल्या सहयोगी प्राध्यापकानेच हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले होते. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याचे राजकारणही तापले असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सोबतच पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्रीही त्यांनी दिली आहे.

डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिली आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. रुग्णालयातील सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे आमचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. 

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची बदली

नायर  रुग्णालयातील लैंगिक छळवणूक  प्रकरणात विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून  नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची नायर रुग्णालयातून बदली करण्यात आली आहे. डॉ. सुधीर मेढेकर हे आता कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहतील. तर कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक  प्रकरणात केलेल्या मुख्यमंत्र्यांकडे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता  यांच्यावर कारवाई करण्याच्या  मागणीनंतर  आता या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर  यांच्या बदलीचे आदेश पारित करण्यात आले आहेत.

'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती'

या लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी ही महानगरपालिका मुख्यालय स्तरावरील 'कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती' यांचेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे, जेणेकरून या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करता येईल. चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, या तक्रारीनुसार आरोपी असलेल्या सहयोगी प्राध्यापकाचे प्रशासनाने निलंबन केले आहे. मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Pune Crime : मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Hanuman mandir : मंदिराला हात लावून दाखवा मग शिवसेनेचं हिंदुत्व दाखवतोAjit Pawar Topi : भूमिपूजनाला टोपी नाही, अजितदादांनी थेट पुजारी काकांचीच टोपी घेऊन स्वत:ला घातलीAaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरतीDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh|आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Embed widget